Monday, May 27, 2024
Homeकोल्हापूरकोल्हापूरात पाचव्या मजल्यावरून पडून महिलेचा मृत्यू

कोल्हापूरात पाचव्या मजल्यावरून पडून महिलेचा मृत्यू


कदमवाडी परिसरातील घाडगे कॉलनी(Ghadhe colony) येथील शिवांजली रेसिडेन्सीमधील पाचव्या मजल्यावरून पडून महिलेचा मृत्यू झाला. मंजुषा विनायक कागले (वय ३९) असे त्यांचे नाव आहे. रविवारी रात्री उशिरा घटना घडली. शाहूपुरी पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.


पोलिस सुत्राकडून सांगण्यात आले की, वाहन खरेदी- विक्री व्यावसायिक विनायक कागले पत्नी, वृध्द आई व मुलांसमवेत शिवांजली रेसिडेन्सीमधील पाचव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये राहतात. रविवारी रात्री उशिरा कागले कुटुंबिय जेवण करून खोलीत गप्पा मारत बसले होते.


पती विनायक यांना मणक्याचा विकार असल्याने मंजुषा यांनी त्यांच्या पाठीला मलम लावला. गरम पाण्याच्या शेक देण्यासाठी त्या स्वयंपाक खोलीलगत असलेल्या पोर्चमध्ये गेल्या. त्याचक्षणी बेसमेंटमध्ये काही तरी पडल्याचा मोठा आवाज झाला. विनायकसह त्यांच्या वृध्द आई पोर्चमध्ये धावल्या. मात्र मंजुषा पोर्चमध्ये आढळल्या नाहीत.
पतीने बेसमेंटच्या दिशेने डोकावले असता पत्नी रक्ताच्या थारोळ्यात निपचिप पडल्याचे दिसून आले. आवाजामुळे रेसिडेन्सी व परिसरातील नागरिकही घटनास्थळी दाखल झाले होते.


डोक्यावर आदळल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला होता. शाहूपुरी पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर उत्तरणीय तपासणीसाठी मृतदेह शासकीय रुग्णालयात हलविण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -