यावर्षी श्रीगणेश मूर्ती विसर्जनासाठी शहापूर खणीसह शहरातील विविध ७२ ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीने कृत्रिम विसर्जन कुंडाचे नियोजन करणेत आले आहे. शहापुर खण येथील विसर्जनस्थळी तसेच गणेशमूर्ती कृत्रिम विसर्जन कुंड तसेच निर्माल्य कुंड असलेल्या सर्व ठिकाणी दोन शिफ्टमध्ये जवळपास ६५० पूर्णवेळ अधिकारी-कर्मचारी तसेच – स्वयंसेवक यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये आरोग्य विभाग, बांधकाम विभाग, वाहन विभाग, प्राथमिक शिक्षण विभाग, आपत्कालीन विभाग आणि अतिक्रमण विभागासह इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय यांचा समावेश आहे.
तर १६ आयशर टेंपो, ५ ट्रॅक्टर, २ यांत्रिक बोटी, २ रुग्णवाहिका, १ अग्निशमन वाहन अशी यंत्रणा सुसज्ज ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांनी दिली.
इचलकरंजी शहरामध्ये गणेशोत्सव पर्यावरणपूर्वक आणि भक्तीभावाने उत्साहात साजरा होत आहे. या अनुषंगाने शनिवार २३ सप्टेंबर रोजी शहरातील घरगुती श्रीगणेश मुर्ती विसर्जन होणार आहे. पर्यावरण पूरक गणेशमूर्ती विसर्जनासाठी नियुक्त केलेल्या सर्व नियंत्रण व समन्वय अधिकारी कर्मचारी तसेच याकामी महानगरपालिका प्रशासनास नेहमीच सहकार्य करणाऱ्या सामाजिक स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी यांच्या समवेत श्रीगणेश विसर्जन उत्साही आणि आनंदी वातावरणात व्हावे या कामाच्या नियोजना संदर्भात महानगरपालिका प्रशासनाची महत्वपूर्ण बैठक श्रीमंत ना. बा. घोरपडे नाट्यगृह येथे आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच उपायुक्त तैमूर मुलाणी, मुल्य निर्धारण कर संकलन अधिकारी सोमनाथ आढाव यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.
या बैठकीत सर्व अधिकारी- कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सुचना करण्यात येऊन विसर्जन सोहळ्यासाठी महानगरपालिका प्रशासकीय यंत्रणा सुसज्ज ठेवण्यात आली आहे. शहर व परिसरातील नागरिकांनी गणेश मूर्ती विसर्जन शहापुर खण येथे किंवा आपल्या घराजवळच्या कृत्रिम विसर्जन कुंडात विसर्जित करून पर्यावरणपूरक आणि आनंदी वातावरणात गणेशोत्सव साजरा करुन महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त दिवटे यांनी केले आहे.
घरगुती गणेश विसर्जनासाठी महानगरपालिका यंत्रणा सज्ज!७२ ठिकाणी कृत्रिम विसर्जन कुंड
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -