Sunday, August 3, 2025
Homeब्रेकिंगमोदी सरकारची महिलांना भेट, आता मिळणार 600 रुपयांना गॅस सिलिंडर

मोदी सरकारची महिलांना भेट, आता मिळणार 600 रुपयांना गॅस सिलिंडर

मंत्रिमंडळाने उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अनुदान 200 रुपयांवरून 300 रुपयांपर्यंत वाढवले आहे. रक्षाबंधन आणि ओणमच्या निमित्ताने एलपीजीच्या दरात 200 रुपयांची कपात करण्याची घोषणा मंत्रिमंडळाने केली होती. आज उज्ज्वला लाभार्थीची रक्कम 200 रुपयांवरून 300 रुपये करण्यात आली आहे.केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषदेत सांगितले की, पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली.

रक्षाबंधन आणि ओणमच्या निमित्ताने आम्ही एलपीजी सिलिंडर 200 रुपयांनी कमी केले होते. ही किंमत 1,100 रुपयांवरून 900 रुपयांपर्यंत कमी झाली.लाभार्थ्यांना 700 रुपयांना गॅस मिळू लागला. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांच्या भगिनींना आता 300 रुपये अनुदान मिळणार आहे. म्हणजेच उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना आता 600 रुपयांना गॅस सिलिंडर मिळणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -