Monday, June 2, 2025
Homeइचलकरंजीकृष्णा योजनेच्या नलिकेला चार ठिकाणी गळती!

कृष्णा योजनेच्या नलिकेला चार ठिकाणी गळती!

 

इचलकरंजी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या कृष्णा नळ पाणी पुरवठा योजनेच्या शिरढोण व टाकवडे येथील जुन्या वितरण नलिका बदलून नवीन वितरण नलिका जोडण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर शहरातील पाणी पुरवठा सुरळीत होईल, अशी अपेक्षा असताना कृष्णा योजनेच्या वितरण नलिकेला महासत्ता चौक, कुरूहिनशेट्टी भवन, कुष्ठरोग वसाहत व सीईटीपी या चार ठिकाणी गळती लागली आहे. मात्र, शहराचा पाणी पुरवठा अद्यापही विस्कळीत असल्याने सदर गळती काढण्याचे काम रविवार नंतर हाती घेणार असल्याचे पाणी पुरवठा विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे.

कृष्णा नळ पाणी पुरवठा योजनेच्या वितरण नलिकेला वारंवार लागलेली गळती थांबवण्यासाठी शिरढोण व टाकवडे येथील वितरण नलिका बदलण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. तसेच कृष्णेतून पाणी उपसाही सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील पाणी पुरवठा सुरळीत होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, पुन्हा चार ठिकाणी गळती लागल्याने कमी दाबाने पाणी उपसा सुरू

आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -