Sunday, September 8, 2024
Homeब्रेकिंगमराठा आंदोलक आक्रमक, मराठवाड्यात जाणाऱ्या एसटी बसेस रद्द

मराठा आंदोलक आक्रमक, मराठवाड्यात जाणाऱ्या एसटी बसेस रद्द

 

मराठा समाजाकडून आरक्षणासाठी पुन्हा आंदोलन सुरु करण्यात आले आहे. मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सहा दिवसांपासून सुरु आहे. त्यानंतरही मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात काहीच निर्णय झाला नाही. यामुळे काही ठिकाणी एसटीच्या बसेसवर दगडफेक करण्यात आली. मराठवाड्यात आंदोलन अधिकच तीव्र आहे. यामुळे पुणे शहरातून मराठवाड्याकडे जाणाऱ्या सर्व बसेस रद्द करण्यात आल्या आहेत. बसेस नसल्यामुळे मराठवाड्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची चांगलीच अडचण झाली आहे. खासगी वाहनाने त्यांना गावी जावे लागत आहे. अनेकांनी आपला प्रवास रद्द केला आहे.पुण्याहून मराठावाड्यात जाणाऱ्या एसटी बसेस रद्द

राज्यात आरक्षण मागणीवरून ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहेत. मराठवाड्यात बीड लातूर जिल्ह्यात आंदोलक आक्रमक झाले आहे. पुणे शिवाजीनगर बसस्थानकावरुन मराठवाड्यातील अनेक भागात जाणाऱ्या आणि येणाऱ्या एसटी बसेस रद्द करण्यात आल्या आहेत. रविवारपासून बीड, लातूरकडे जाणाऱ्या एसटी बस सेवा रद्द केली आहे. यामुळे पुणे शहरातून मराठवाड्यात जाणाऱ्या प्रवाशांची चांगलीच अडचण झाली आहे. अनेक नागरिकांना आपला प्रवास रद्द करावा लागला.

 

बसेसवर नेत्याचा फोटोला काळे फासले

पुणे जिल्ह्यातील भोरमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाज आक्रमक झाला आहे. एसटी महामंडळाच्या बसेवर असलेल्या जाहिरातीवरील नेत्यांच्या फोटोला काळे फासले गेले आहे. जोरदार घोषणाबाजी करत जाहिरातींवर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या फोटोला काळे फासण्यात आले आहे. जो पर्यंत आरक्षणाचा मुद्दा सुटत नाही, तोपर्यंत गावात येणाऱ्या एसटीवर सरकारच्या जाहिरातींवरील नेत्यांच्या फोटोंना काळे फासण्यात येणार आहे, अशी भूमिका मराठा समाजाने घेतली आहे.लातूरवरुन सोडण्यात येणाऱ्या बसेस रद्द

लातूर बसस्थानकामधून सोडण्यात येणाऱ्या सर्व एसटी बसेसची सेवा पूर्णतः बंद करण्यात आल्या आहे. यामुळे अनेक प्रवासी बस स्थानकात अडकून पडले आहेत. लातूर शहर आणि ग्रामीण भागात सातत्याने आंदोलने सुरू आहे. यामुळे एसटीने खबरदारी म्हणून बस सेवा तात्पुरती बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी दुपार पासून ही बस सेवा बंद आहे. विशेष म्हणजे लातूरकडे येणाऱ्या बसेसही बंद ठेवण्यात आल्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -