Saturday, December 21, 2024
Homeव्हायरल व्हिडिओजेव्हा घरचे लव्ह मॅरेजसाठी तयार होतात; तरुणीला झालेला आनंद :VIDEO व्हायरल

जेव्हा घरचे लव्ह मॅरेजसाठी तयार होतात; तरुणीला झालेला आनंद :VIDEO व्हायरल

सोशल मीडियावर रोज कोणता ना कोणता व्हिडीओ या ना त्या कारणावरून व्हायरल होत असतो. आपल्याला माहितीये आजकाल मुलांना मुली मिळणं किती कठीण झालंय. मुलींच्या वाढत जाणाऱ्या अपेक्षा मुलांच्या डोक्याचं टेंशन वाढवतात.दरम्यान ज्याचं लव्ह मॅरेज असतं त्यांनाही घरच्यांकडून परवानगी मिळवताना नाकी नऊ येतात. मात्र हेच आई-वडिल जेव्हा लग्नासाठी तयार होतात, तेव्हा जोडप्याचा आनंद गगणात मावत नाही. अशाच एका तरुणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

हल्ली आपल्याकडे लव्ह मॅरेजचं प्रमाण बऱ्यापैकी वाढलं आहे. दोन्ही स्थळं सर्वच बाबतीत समान स्तरावरची असतील, तर आजकाल अनेक घरांमधून ते सहजासहजी स्विकारलंही जात आहे. काही घरांमध्ये पालकांना नाही पटलं तरी मुलांच्या आनंदासाठी ते तयार होत आहेत. अशाच जोडप्याच्या घरचे तयार झाले आणि मुलीच्या आनंदाला पारच उरला नाही. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, बाहेर लग्नाची बोलणी करण्यासाठी पाहुणे आले असताना ही मुलगी आतल्या खोलीत जोर जोरात डान्स करत आहे.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

तिला पाहून तिचा मित्रही नाचू लागतो, अखेर इतक्या वर्षांचं प्रेम घरच्यांनी मान्य केल्यानंतर मुलीला खूप आनंद झाला आहे. मुलीला किती आनंद झालाय हे तुम्ही व्हिडीओत पाहू शकता.

सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात, यातील काही मजेदार असतात तर काही व्हिडीओ पाहून संताप येतो. हा व्हिडीओ @anjali_says1 या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला हजारो लाईक्स, व्ह्युज मिळत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -