Friday, February 23, 2024
Homeकोल्हापूरस्पर्धा परीक्षेत यश मिळत नसल्याने तरुणाची आत्महत्या

स्पर्धा परीक्षेत यश मिळत नसल्याने तरुणाची आत्महत्या

स्पर्धा परीक्षेत यश मिळत नसल्याने नैराश्येतून गजानन धोंडिराम गुरव (वय 23, रा. जाखले, ता. पन्हाळा) या तरुणाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. रविवारी रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली. स्पर्धा परीक्षेत अपयश आल्‍याने तरूणाने जीवन संपवल्‍याने परिसरात हळहळ व्यक्‍त करण्यात येत आहे.

जाखले येथील गजानन गुरव याने तीनवेळा स्पर्धा परीक्षा दिली होती. यामध्ये त्याला अपयश आले होते. त्यानंतर त्याने दिलेल्या एमपीएससीच्या परीक्षेत गजाननाला दोन विषयांमध्ये कमी गुण मिळाल्याने तो चार दिवसांपासून नाराज होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -