Friday, August 1, 2025
Homeब्रेकिंगकुणबी पुरावे असलेल्या लोकांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठीच GR निघाला?

कुणबी पुरावे असलेल्या लोकांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठीच GR निघाला?

ताजी बातमी ऑनलाईन टीम

राज्यात शांततेत सुरु असलेल्या मराठा आरक्षणाला काही ठिकाणी गालबोट लागले आहे. संतप्त जमावाने राजकीय नेत्यांची घरे, गाड्या जाळण्याचा प्रयत्न केला. शांततेच्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने पोलीस यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांची बैठक झाली. या बैठकीत मराठा आरक्षण आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यात आली.

मंत्रिमंडळातील निर्णय –
मराठवाड्यातील निझामकालीन व इतर उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे मराठा – कुणबी, कुणबी – मराठा जात प्रमाणपत्रांसंदर्भात कार्यवाही निश्चित करणाऱ्या न्या. संदीप शिंदे समितीचा प्रथम अहवाल स्वीकृत.
– कुणबी नोंदी असलेल्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरू.
– मराठा समाजाचे सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी मागासवर्ग आयोग इम्पेरिकल डेटा गोळा करणार.
– न्या. दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली न्या. मारोती गायकवाड, न्या संदीप शिंदे यांचे सल्लागार मंडळ मराठा आरक्षणाबाबत कायदेशीर प्रकरणांत शासनाला मार्गदर्शन करणार.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -