Sunday, September 8, 2024
Homeब्रेकिंगअनिल देशमुखांची मुलगी आणि सून अडचणीत

अनिल देशमुखांची मुलगी आणि सून अडचणीत

ताजी बातमी ऑनलाईन टीम


अनिल देशमुखांच्या 100 कोटी कथित खंडणी प्रकरणी क्लीन चीटचा अहवाल फोडल्याप्रकरणी मुलगी आणि सुनेला आरोपी बनवण्यात आलंय…अनिल देशमुखांची मुलगी पूजा आणि सून राहतवर सीबीआयने आरोपपत्र दाखल केलंय…मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या 100 कोटी रुपयांच्या कथित खंडणी प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख जवळपास वर्षभर तुरुंगात होते…याप्रकरणी उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली सीबीआयने तपास केला…तपासाच्या अहवालाचा मसुदा 2021 मध्ये कोर्टाला सादर होण्याआधीच फुटला…हा मसूदा फोडल्याप्रकरणी देशमुखांचे वकील, पोलीस उपनिरीक्षक अभिषेक तिवारींवर सीबीआयने आधीच आरोपपत्र दाखल केलंय…मात्र, आता या प्रकरणात सीबीआयने पुरवणी आरोपपत्र दाखल करुन देशमुखांची मुलगी पूजा आणि सून राहत यांनाही आरोपी केलंय…यामुळे देशमुखांच्या अडचणीत पुन्हा वाढ झालीय…

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -