Sunday, December 22, 2024
Homeसांगलीकृषी अधिकारी 'लाचलुचपत'च्या जाळ्यात; खताच्या दुकानाचा परवाना देण्यासाठी मागितली लाच

कृषी अधिकारी ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात; खताच्या दुकानाचा परवाना देण्यासाठी मागितली लाच

 

सेंद्रिय खतांच्या विक्री (Selling Organic Fertilizers) दुकानाचा परवाना देण्यासाठी नऊ हजारांची लाच घेताना काल (मंगळवार) कृषी अधिकाऱ्याला (Agriculture Officer) पकडण्यात आले. सुनील जगन्नाथ जाधव (वय ५०, सध्या रा. जाधववाडी, कोल्हापूर, मूळ रा. शाहूपुरी, सातारा) असे त्याचे नाव आहे.

तो वर्ग दोनचा अधिकारी असून राजर्षी शाहू मार्केट यार्ड परिसरात सायंकाळी कारवाई करत जाधवला अटक केली, अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उप अधीक्षक सरदार नाळे यांनी दिली. नाळे यांनी कारवाईबाबत दिलेली माहिती अशी : तक्रारदाराने बियाणे, खते आणि औषधांची विक्री करण्यासाठी दुकानाचा परवाना मिळावा, अशी मागणी ऑनलाईन आणि ऑफलाईने अशा दोन्ही पद्धतीने जिल्हा कृषी कार्यालयाकडे केली होती.अर्ज मंजूर करून पुढील कार्यवाहीसाठी वरिष्ठांकडे पाठवल्याबद्दल सुनील जाधव याने तक्रारदाराकडे दहा हजार रुपये लाच मागितली. चर्चेनंतर नऊ हजारांवर तडजोड झाली.

त्यानुसार आज रक्कम देण्याचे ठरले होते. त्यानुसार सायंकाळी पाचच्या सुमारास जाधवला तक्रारदाराकडून लाच घेताना अटक केली.त्यानंतर पथकाने जाधव याच्या जाधववाडी येथील घराची झडती घेतली. त्यानंतर सातारा येथील घराची झडती घेण्यासाठी पथक रवाना झाले आहे. पोलिस निरीक्षक आसमा मुल्ला, उपनिरीक्षक संजीव बंबरगेकर यांच्यासह अजय चव्हाण, विकास माने, सचिन पाटील, सुधीर पाटील, विष्णू गुरव यांच्या पथकाने कारवाई केली.ठिकाण शेवटपर्यंत गुलदस्त्यातलाच देण्याचे आणि घेण्याचे निश्‍चित झाले होते. सलग सुट्ट्यांनंतर मंगळवारी लाच रक्कम देण्याचेही ठरले; मात्र नेमके कुठे द्यायची, हे जाधव याने सांगितले नव्हते. त्यामुळे कारवाई कुठे करायची, याची खात्री तक्रारदार आणि अधिकाऱ्यांनाही नव्हती, मात्र सायंकळी पाच वाजता कार्यालय सुटल्यावर मार्केट यार्ड येथे तक्रारदाराला बोलविले आणि जाधव छाप्यात अडकला. तक्रारदार जैविक आणि संेद्रिय शेतीतील तज्ज्ञ आहेत.तक्रारी द्या!शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, त्यांच्या वतीने एजंट, शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त पैशांची मागणी करणाऱ्यांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार करता येते. संबंधित तक्रारदारांनी शनिवार पेठेतील कार्यालयात तक्रार द्यावी, असे आवाहन उपअधीक्षक सरदार नाळे यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -