Sunday, December 22, 2024
Homeसांगलीसांगलीच्या व्यापाऱ्यास धनादेश बाऊन्स प्रकरणात तुरूंगवासाची शिक्षा

सांगलीच्या व्यापाऱ्यास धनादेश बाऊन्स प्रकरणात तुरूंगवासाची शिक्षा

 

ऑर्डरप्रमाणे माल पुरवठा केल्यानंतर त्याच्या किंमतीपोटी दिलेला धनादेश बाऊन्स झाल्या प्रकरणात सांगली येथील व्यापार्यास ३ महिने तुरूंगवासाची शिक्षा वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश पी.बी.पवार यांनी सुनावली.तसेच नुकसान भरपाई म्हणून फिर्यादींना १७ लाख ५५ हजार रुपये निकालाची प्रत मिळाल्यापासून ३० दिवसांच्या आत देण्यात यावेत. ही रक्कम न भरल्यास सहा महिने अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.

 

प्रवीण कुमार सजणे, प्रोप्रायटर ऑफ साई ट्रेडींग कंपनी सांगली याला शिक्षा सुनावण्यात आली आहे. सॉलिटेअर पॅकेजिंग प्रा.लि. तर्फे संचालक प्रशांत श्रीरंग पवार यांनी अ‍ॅड. आर.व्ही.नांगरे यांच्यामार्फत येथील न्यायालयात निगोशिएबल इंस्टमेंट अ‍ॅक्ट १३८ नुसार खटला दाखल केला होता. अ‍ॅड. आर.व्ही.नांगरे यांना अ‍ॅड.ओम.आर.नांगरे यांनी सहाय्य केले. आरोपींच्या कंपनीने मालाची खरेदी केली. त्या बदल्यात ८ लाख ७७ हजार ७२१ रुपयांचा धनादेश दिला. हा बाऊन्स झाल्याने खटला दाखल करण्यात आला. यामध्ये साक्ष पुरावा नोंदवून न्यायालयाने हा आदेश दिला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -