महागाईने गेल्या वर्षापासून नागरिकांचे पार कंबरडे मोडले आहे. कोणत्याच आघाडीवर जनतेला दिलासा मिळालेला नाही. सर्वच वस्तूचे भाव वाढलेले आहे. त्यात अन्नधान्य, डाळी, तेल, गॅस, पेट्रोल-डिझेल, सीएनजी यांचे भाव वाढलेले आहे. कर्जाचे वाढीव हप्ते भरता भरता कर्जदार मेटाकुटीला आले आहेत. या एप्रिलपासून ते ऑक्टोबरपर्यंत भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ न केल्याने तेवढाच तो काय दिलासा मिळाला आहे. आज रेपो दराविषयी आरबीआयच्या पतधोरण समितीची बैठक होत आहे. चालू आर्थिक वर्षातील 5 वी आणि या कॅलेंडरप्रमाणे 6 वी बैठक आहे. या बैठकीत ग्राहकांना आता दिलासा मिळतो की त्याचा खिशा ईएमआय वाढल्याने रिकामा होतो, हे थोड्याचवेळात समोर येईल.महागाईने वाढवली चिंता
नोव्हेंबर महिन्यात CPI महागाईच आकडे चिंता वाढवणारे असल्याचे संकेत मिळत आहे. हा आकडा अंदाजपेक्षा जास्त म्हणजे 6 टक्क्यांच्यावर पोहचण्याची शक्यता आहे. आरबीआयच्या टॉलरेंस बँडपेक्षा हा आकडा अधिक आहे. त्यामुळे महागाई ही रेपो दर वाढण्यासाठी कारणीभूत ठरु शकते. जागतिक बाजारात इंधनाचे दर घटले आहे. नोव्हेंबर महिन्यात टोमॅटो आणि काद्याने डोके वर काढले होते. डाळी आणि इतर अन्नधान्याच्या किंमती वाढल्याने महागाई वाढली आहे. येत्या काही महिन्यात या आघाडीवर दिलासा मिळण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे रेपो दराविषयी चिंता वाढली आहे.वर्षभरात इतकी वाढ
व्याज दरात वाढ करण्याची सुरुवात गेल्या वर्षी मे महिन्यात झाला होता. रिझर्व्ह बँकेने एमपीसीने आपत्कालीन बैठक बोलावली होती. मे 2022 मध्ये आरबीआयने मोठ्या कालावधीनंतर रेपो दरात बदल केला होता. महागाई नियंत्रणात आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेने मे 2022 पासून ते फेब्रुवारी 2023 पर्यंत 6 वेळा रेपो रेटमध्ये वाढ केली होती. त्यामुळे रेपो दर 6.50 टक्क्यांवर पोहचला. त्यानंतर रेपो दरात वाढ झालेली नाही.
व्याज दर वाढण्याची शक्यता कमी
अनेक तज्ज्ञ यावेळी पण आरबीआय रेपो दरात वाढ करणार नसल्याचा अंदाज वर्तवित आहेत. पण केंद्रीय बँक धोरणात बदल करु शकते. व्याज दर न वाढल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळेल. केंद्रीय बँकेने यावर्षाच्या सुरुवातीला फेब्रुवारी महिन्यात रेपो दरात वाढ केली होती. पण चालू आर्थिक वर्षात, एप्रिल महिन्यापासून रेपो दरात कोणताही बदल झालेला नाही