Monday, December 23, 2024
Homeइचलकरंजीचिंता वाढली, गेल्या 24 तासात Corona रुग्णसंख्येत दुप्पट वाढ, पाहा कोणत्या राज्यात...

चिंता वाढली, गेल्या 24 तासात Corona रुग्णसंख्येत दुप्पट वाढ, पाहा कोणत्या राज्यात किती रुग्ण

देशात गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ होताना दिसेतय. ओमीक्रॉन व्हेरिएंटच्या नवा सब व्हेरिएंट JN.1 यासाठी जबाबदार असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार गेल्या चोवीस तासात देशात कोरोनाच्या नव्या 640 रुग्णांची नोंद झाली आहे. देशात सध्या कोरोनाची सक्रीय रुग्णसंख्या 2997 इतकी झाली आहे. धक्कादायक म्हणजे केरळात गेल्या 24 तासात कोरोनामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला. तर देशभरात गुरुवारी कोरोनामुळे सहा रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गेल्या सात महिन्यात कोरोनामुळे मृत्यू झालेला हा सर्वात मोठा आकडा आहे. भारतात आतापर्यंत कोरोना संक्रमित प्रकरणं 4.5 कोटीहून अधिक (4,50,07,212) आहेत. यातले 4,44,70,887 पूर्ण पणे बरे झालेत. त्यामुळे रिकव्हरी रेट 98.81 टक्के इतका आहे.

तर देशात कोरोनामुळे मृत्यू झाल्यांची संख्या 5,33,328 इतकी झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार देशात 220.67 कोटी लोकांचं लसीकरण झालं आहे. केरळात 265 नवे रुग्ण, 1 रुग्णाचा मृत्यू देशताली एकूण रुग्णसंख्येपैकी सर्वाधिक रुग्ण हे एकट्या केरळ राज्यात आहेत. गेल्या चोवीस तासात केरळात सर्वाधिक 265 रुग्णांची नोंद झाली आहे. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला. केरळात कोरोनाच्या सक्रिया रुग्णांची संख्या 2,606 इतकी आहे. केरळात गेल्या तीन वर्षात कोरोनामुळे 72,060 जणांचा मृत्यू झाला. कोणत्या राज्यात किती रुग्ण पाहा महाराष्ट्र : नवे रुग्ण – 8, सक्रिय रुग्ण – 53 केरळ : नवे रुग्ण – 265, सक्रिय रुग्ण -2606 कर्नाटक : नवे रुग्ण – 8, सक्रिय रुग्ण – 53 तामिळनाडू : नवे रुग्ण – 15, सक्रिय रुग्ण – 104 दिल्ली : नवे रुग्ण – 13, सक्रिय रुग्ण – 105 आंध्रप्रदेश : नवे रुग्ण – 3, सक्रिय रुग्ण – 4 आसाम : नवे रुग्ण – 0, सक्रिय रुग्ण – 1 बिहार : नवे रुग्ण – 2, सक्रिय रुग्ण – 2 गोवा : नवे रुग्ण – 0, सक्रिय रुग्ण – 16

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -