Sunday, December 22, 2024
Homeइचलकरंजीकुरुंदवाड ; स्टेअरींगमध्ये बिघाड झाल्याने एसटीचा अपघात

कुरुंदवाड ; स्टेअरींगमध्ये बिघाड झाल्याने एसटीचा अपघात

कुरुंदवाड ; स्टेअरींगमध्ये बिघाड झाल्याने एसटीचा अपघात

शेडशाळ (ता. शिरोळ) हद्दीत गडगे मळ्याच्या शेतातील चरीत कुरुंदवाड डेपोची एस. टी घसरून झालेल्या अपघातात ४७ प्रवाशांना | किरकोळ दुखापत झाली आहे. यामध्ये विध्यार्थी ही जखमी झाल्याने शिरोळ येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान स्टेरिंगमध्ये बिघाड झाल्याने हा अपघात झाल्याचे डेपोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

याबाबतची वर्दी रात्री उशिरा पोलीस ठाण्यात दाखल करण्याचे काम सुरू होते. कुरुंदवाड गणेशवाडी ही १२ वाजताची एस. टी प्रवासी घेऊन जात असताना शेडशाळ दरम्यानच्याग णेशवाडी रस्त्यावरील गडगे मळ्याजवळ अचानक समोरून

येणाऱ्या वाहनाला रस्ता देताना स्टेरिंग मध्ये बिघाड झाल्याने चालकाचा ताबा सुटला व बस थेट लगत असलेल्या चरीमध्ये गेली. एकबाजूला एस.टी झुकून प्रवासी आदळल्याने ४७ प्रवाशांना दुखापत झाली.

अपघात झाल्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरताच जिल्हा परिषद सदस्य दादेपाशा पटेल, शफी पटेल, सतीश पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन १०८ रुग्णवाहिकेला पाचारण करून जखमींना उपचारासाठी पाठवले. दरम्यान बसचा पुढील बाजू चक्काचूर झाला आहे. या ठिकाणी विद्युत खांब होते. सुदैवाने एस. टी शेतात वळल्याने शॉर्ट सर्किटचा प्रसंग टळला याठिकाणी कुरुंदवाड आगार प्रमुख नामदेव पतंगे दाखल होऊनप्रवाशांची विचारपूस केली. घटनास्थळी गर्दी झाल्याने वाहतूकविस्कळीत झाली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -