Saturday, July 27, 2024
Homeकोल्हापूरजोतिबा डोंगरावर पाणी टंचाई

जोतिबा डोंगरावर पाणी टंचाई

जोतिबाचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले झाल्याने ऐन भाविकांच्या वाढत्या गर्दीत जोतिबा डोंगर ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. दहा दिवस पाणी नसल्याने पदरमोड करून टँकरने पाणी विकत आणण्याची वेळ ग्रामस्थावर आली आहे.

संपूर्ण महाराष्ट्रासह तीन चार राज्यांचे कुलदैवत असणार्या या तीर्थक्षेत्रावर जोतिबा डोंगरावर पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण झाला आहे. जोतिबा डोंगरावर गेले दहा दिवस पाणी पुरवठा बंद आहे. दिपावली सुट्टीमुळे भाविकांची गर्दी वाढत आहे.

येणाऱ्या भाविकांना पाणी देण्यासाठी ग्रामस्थांना मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. पाण्यासाठी टँकर, आड, विहीरी, तळे, कुंड यांचा आधार घेण्याची वेळ आली आहे. एका टैंकरसाठी दोन ते तीन हजार रुपये देऊन पाणी विकत घ्यावे लागत आहे. जोतिबा ग्रामस्थांच्या मागणीनुसार तात्काळ माजी आमदार अमल महाडीक यांनी टँकरने पाणी पुरवठा केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -