Tuesday, February 27, 2024
Homeब्रेकिंगचल, खोटारडा… मलायकालाही असाच बोलला होता; एक पोस्ट अन् अरबाज झाला बेक्कार...

चल, खोटारडा… मलायकालाही असाच बोलला होता; एक पोस्ट अन् अरबाज झाला बेक्कार ट्रोल

 

अभिनेता अरबाज खानची फिल्मी कारकीर्द फारशी गाजली नाही. अनेक चित्रपटात झळकलेल्या अरबाजला अभिनेता म्हणून फारशी ओळख मिळाली नाही. भाईजना सलमान खानचा भाऊ म्हणूनच तो जास्त प्रसिद्ध आहे. त्याचा आणि मलायका अरोराचा घटस्फोट बराच गाजला. पण त्यानंतर अरबाजला पुन्हा प्रेम मिळालं. गेल्याच महिन्यात त्याने शूरा खान हिच्याशी लग्न करत नव्या आयुष्याला सुरुवात केली. 24 डिसेंबर रोजी कुटुंबीय आणि मित्र-मंडळींच्या उपस्थितीत शूरा-अरबाजचा विवाह पार पडला. त्यांचे बरेच फोटोही व्हायरल झाले. लग्नानंतर ते दोघे फिरायलाही गेले.

अरबाजची दुसरी पत्नी शूरा हिचा नुकताच वाढदिवस झाला. लग्न होईपर्यंत आणि त्यानंतरही अरबाजने या विषयावर मौन राखणे पसंत केले. पण पत्नीच्या लग्नानंतरच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त अरबाजने इन्स्टाग्रामवर एक लांबलचक पोस्ट लिहून तिच्याबद्दलच्या भावना, प्रेम व्यक्त केलं. ‘ वाढदिवसाच्या शुभेच्छा शुरा… तुझ्या शिवाय दुसरं कोणीच मला इतकं आनंदी ठेवू शकत नाही. माझं उर्वरीत आयुष्य मला तुझ्यासोबत जगायचं आहे’ असं त्याने लिहीलं. सध्या अरबाज याची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पण त्याला या पोस्टवर बऱ्याच ट्रोलिंगचाही सामना करावा लागत आहे.खोटारडा.. मलायकालाही असंच बोलला होतास ना

 

अरबाझने त्याची दुसरी पत्नी शुरा हिच्या वाढदिवसासाठी लिहीलेल्या पोस्टवर लाइक्स , कमेंट्सचा वर्षाव होत आहे. पण त्यामुळे त्याला ट्रोलिंगचाही सामना करावा लागत आहे. अनेक युजर्सनी अरबाजला ट्रोल करत कमेंट्स लिहील्या आहेत. ‘ चल, खोटारडा.. (तू) मलायकाला सुद्धा (अरोरा) असंच बोलला असशील ना ‘ अशी कमेंट एका युजरने केली. तर ‘थोड्या वर्षांपूर्वी तू मलायकाबद्दल असच बोलला होतास.. आता थोड्या वर्षांनी अजून कोणासाठी तू अशीच पोस्ट करशील’ असं दुसऱ्या युजरने लिहीलं. तर काहींनी या पोस्टमुळे अरबाजची पहिली पत्नी मलायका अरोरा हिला मिरच्या झोंबल्या असतील, अशी टीकाही केली. एकंदरच या पोस्टवर ट्रोलर्सनी धूमाकूळ घातला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -