Saturday, July 27, 2024
Homeब्रेकिंगन्यूझीलंडचा पाकिस्तानवर 7 विकेट्सने विजय

न्यूझीलंडचा पाकिस्तानवर 7 विकेट्सने विजय

 

 

न्यूझीलंड क्रिकेट टीमने पाकिस्तानवर चौथ्या टी 20 सामन्यात 7 विकेट्सने विजय मिळवला आहे. पाकिस्तानने न्यूझीलंडला विजयासाठी 159 धावांचे आव्हान दिलं होतं. न्यूझीलंडने हे आव्हान डॅरेल मिचेल आणि ग्लेन फिलीप्स या दोघांनी केलेल्या तडाखेदार नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर 18.1 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून पूर्ण केलं. न्यूझीलंडचा हा या मालिकेतील सलग चौथा विजय ठरला.

न्यूझीलंडने या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 4-0 ने आघाडी घेतली आहे.पाकिस्तानच्या गोलंदाजांनी 159 धावांचा पाठलाग करायला आलेल्या न्यूझीलंडला सुरुवातीला झटपट 3 झटके दिले. फिन एलन 8, टीम सायफर्ट 0 आणि विल यंग 4 धावा करुन बाद झाले. त्यामुळे न्यूझीलंडची स्थिती 2.4 ओव्हरमध्ये 3 बाद 20 अशी झाली. मात्र त्यानंतर डॅरेल मिचेल आणि ग्लेन फिलिप्स या जोडीने आधी न्यूझीलंडचा डाव सावरला. दोघेही सेट झाले. त्यानंतर पाकिस्तानवर तुटून पडले.

दोघांनी वैयक्तिक अर्धशतकं झळकावली. याच जोडीने पाकिस्तानच्या पराभवाचा खड्डा खोदला. त्यामुळे न्यूझीलंडच्या विजयाचा मार्ग सोपा झाला.न्यूझीलंडकडून डॅरेल मिचेल याने सर्वाधिक नाबाद 72 धावांची खेळी केली. डॅरेलने 44 बॉलमध्ये 7 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने ही खेळी केली. तर ग्लेन फिलिप्स याने 52 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 5 फोरसह नाबाद 50 धावा केल्या. पाकिस्तानकडून कॅप्टन शाहिन आफ्रिदी याने एकट्यानेच तिन्ही विकेट्स घेतल्या. मात्र त्याला इतरांना साथ देत एकही विकेट घेता आली नाही.

 

दरम्यान त्याआधी न्यूझीलंडने टॉस जिंकून पाकिस्तानला बॅटिंगसाठी भाग पाडलं. पाकिस्तानने ठकाविक अंतराने विकेट्स गमावल्या. पाकिस्तानची नाजूक स्थिती होती. मात्र ओपनर मोहम्मद रिझवान याने एका बाजू लावून धरली होती. रिझवान याने 63 बॉलमध्ये 90 धावांची खेळी केली. त्यामुळे पाकिस्तानला 5 विकेट्स गमावून 20 ओव्हरमध्ये 158 धावांपर्यंत मजल मारता आली. रिझवानने ही खेळी करुन एकाप्रकारे पाकिस्तानची लाज राखली.

 

न्यूझीलंडचा सलग चौथा विजयपाकिस्तान प्लेईंग ईलेव्हन | शाहीन आफ्रिदी (कॅप्टन), सैम अयुब, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), बाबर आझम, फखर जमान, साहिबजादा फरहान, इफ्तिखार अहमद, मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम ज्युनियर, हरिस रौफ आणि जमान खान.

 

न्यूझीलंड प्लेईंग ईलेव्हन | मिचेल सँटनर (कर्णधार), फिन एलन, टिम सेफर्ट (विकेटकीपर), विल यंग, डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, अॅडम मिल्ने, मॅट हेन्री, टीम साउथी आणि लॉकी फर्ग्युसन.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -