Tuesday, February 27, 2024
Homeब्रेकिंगअखेर रश्मिकासोबतच्या साखरपुड्याच्या चर्चांवर विजय देवराकोंडाने सोडले मौन

अखेर रश्मिकासोबतच्या साखरपुड्याच्या चर्चांवर विजय देवराकोंडाने सोडले मौन

दाक्षिणात्य अभिनेता विजय देवराकोंडा आणि रश्मिका मंदान्ना यांच्या मागील काही दिवसांपासून लग्नाच्या चर्चा सुरू आहेत. लवकरच हे दोघे साखरपुडा करणार असल्याचेही म्हंटले जात होते.यादरम्यान या सर्व चर्चांवर स्वत: विजय देवराकोंडाने प्रतिक्रिया दिली आहे. रश्मिका आणि विजय यांनी त्यांच्या नात्याबद्दल मौन बाळगले असले तरी दोघेही अनेकदा एकत्र असल्याचे पाहायला मिळाले. परंतु आता त्याने साखरपुड्याच्या चर्चांवर मौन सोडलं आहे.

 

एका मुलाखतीमध्ये विजयने साखरपुड्याच्या चर्चांना फेटाळले आहे. “मी फेब्रुवारीमध्ये लग्न किंवा साखरपुडा करत नाही. पत्रकारांना दर दोन वर्षांनी माझं लग्न लावायचं असते, असे आता मला वाटू लागले आहे. प्रत्येक वर्षी मी या अफवा ऐकतो. ते फक्त माझ्या मागे लागले आहेत की कधी मी त्यांच्या तावडीत सापडतो आणि कधी माझं लग्न होतं.”

 

विजयच्या या उत्तरामुळे साखरपुड्याच्या चर्चांना पूर्णविराम लागला आहे.नुकतेच विजय देवरकोंडा आणि रश्मिका मालदीवमध्ये व्हेकेशन एन्जॉय करताना दिसले. दोघांनीही त्यांचे सिंगल फोटो सोशल मीडियावर शेअर केले असले तरी चाहत्यांना नेहमीप्रमाणे ते एकत्रच असल्याचे लक्षात आले.विजय देवरकोंडा यांच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तो लवकरच ‘फॅमिली स्टार’ या चित्रपटात दिसणार आहे.

तो शेवटचा ‘खुशी’ चित्रपटात सामंथा रुथ प्रभूसोबत दिसला होता. रश्मिकाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर, ‘अ‍ॅनिमल’च्या यशानंतर, रश्मिकाने आता ‘पुष्पा 2: द रुल’ची तयारी सुरू केली आहे. सध्या तो चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. अल्लू अर्जुन स्टारर हा चित्रपट यावर्षी 15 ऑगस्टला थिएटरमध्ये दाखल होणार आहे. चाहतेही या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -