Sunday, December 22, 2024
Homeकोल्हापूरकोल्हापुरात खळबळ ! सहा वर्षाच्या मुलीवर तेरा वर्षाच्या मुलाकडून अत्याचाराचा प्रयत्न

कोल्हापुरात खळबळ ! सहा वर्षाच्या मुलीवर तेरा वर्षाच्या मुलाकडून अत्याचाराचा प्रयत्न

गांधीनगर परिसरातील घटना : सहा वर्षाच्या (kolhapur crime) बालिकेस चॉकलेट देण्याचे अमिष दाखवून एका तेरा वर्षाच्या मुलाने बंगल्याच्या टेरेसवर नेऊन अत्याचाराचा प्रयत्न केला. हा प्रकार मुलीच्या आईने पाहिला त्यानंतर बेदम चोप देऊन संबंधित अल्पवयीन मुलास गांधीनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली असून काही लोकांनी गांधीनगर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून या घटनेचा निषेध नोंदवला.

पीडित मुलगी सहा वर्षाची असून शुक्रवारी दुपारी अडीच वाजता ती आपल्या समवयस्क मुलांबरोबर खेळत असताना संशयित मुलगा तिथे गेला त्या मुलीस चॉकलेट खाण्यासाठी देतो असे सांगून एका बंगल्याच्या गच्चीवर नेत, त्या ठिकाणी तो तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न करू लागला, मुलगी बराच वेळ दिसेनाशी झाली, (kolhapur crime) त्यामुळे तिची आई मुलीचा शोध घेत होती.

यावेळी परिसरातील एका सीसीटीव्ही कॅमेर्यात या मुलीस तेरा वर्षाचां मुलगा बंगल्याच्या टेरेसवर घेऊन जात असल्याचे दिसले, मुलीच्या आईने त्या ठिकाणी जाऊन पाहिले तेव्हा तिला मोठा धक्का बसला. अल्पवयीन मुलगा या मुलीशी अत्याचार करण्याचा प्रयत्न करत होता. पीडित मुलीच्या आईने आरडाओरडा केल्यानंतर त्या ठिकाणी लोक जमा झाले लोकांनी अल्पवयीन मुलास चोप देऊन गांधीनगर पोलीस ठाण्यात आणले.

 

गांधीनगर परिसरात घडलेल्या या घटनेचा निषेध करण्यासाठी परिसरातील दुकानदार व्यापारी यांनी आपली दुकाने बंद ठेवली आणि दुपारी चार वाजता गांधीनगर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. या घटनेतील संशयित अल्पवयीन मुलावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.

हा गंभीर प्रकार पाहून शहर व परिसरातील नागरिकांनी या ठिकाणी गर्दी केली होती. करवीर चे उपाध्यक्ष संकेत गोसावी गांधीनगरचे स. पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांनी लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले. संबंधित अल्पवयीन मुलास ताब्यात घेऊन त्याला बालसुधार ग्रहात पाठवण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -