Tuesday, February 27, 2024
Homeब्रेकिंगAyodhya ला जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, केवळ ₹१६२२ रुपयांत मिळणार तिकीट; SpiceJet ची...

Ayodhya ला जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, केवळ ₹१६२२ रुपयांत मिळणार तिकीट; SpiceJet ची घोषणा

अयोध्येतील राम मंदिरात प्रभू श्रीराम यांचं आगमन झालं आहे. याबाबत संपूर्ण देशात प्रचंड उत्साह आहे. लोक आपापल्या परीनं हा सोहळा साजरा करत आहेत. अशा परिस्थितीत स्पाईसजेट (SpiceJet) या एअरलाईन कंपनीनंही या सोहळ्याला खास बनवण्यासाठी आपल्या ग्राहकांसाठी एक उत्तम ऑफर आणली आहे.स्पाईसजेटनं आपल्या ग्राहकांसाठी स्वस्त उड्डाणं जाहीर केली आहेत. देशातील विविध शहरांमधून ही विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे.

 

अयोध्येतील राममंदिरात प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. आता स्पाइसजेटही हा दिवस खास पद्धतीनं साजरा करत आहे. तुम्ही फक्त २६२२ (सर्व समावेशी) मध्ये नॉन-स्टॉप फ्लाइट बुक करू शकता. याव्यतिरिक्त, स्पाइसजेटच्या वेबसाइटनुसार, तुम्ही फ्री डेट चेंज ऑफरसह तुम्ही प्रवासाची तारीख सहजपणे बदलू शकता. परंतु यासाठी काही अटींची पूर्तता करावी लागणार आहे.

 

यासोबतच स्पाईसजेट १ फेब्रुवारी २०२४ पासून अयोध्येला इतर अनेक शहरांशी जोडण्याचा प्रयत्न करत आहे. चेन्नई, अहमदाबाद, दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, जयपूर, पाटणा आणि दरभंगा येथून अयोध्येसाठी उड्डाणं सुरू केली जातील.

 

काय आहे अधिक माहिती?

 

बुकिंग पिरिअड – २२ ते २८ जानेवारी २०२४

ट्रॅव्हल पिरिअड – २२ जानेवारी ते ३० सप्टेंबर २०२४

 

नियम आणि अटी

 

-विक्री ऑफर २२ जानेवारी २०२४ (0001 HRS) – २८ जानेवारी २०२४ (2359HRS) पर्यंत उपलब्ध असेल.

-विक्री ऑफर फक्त २२ जानेवारी २०२४ ते ३० सप्टेंबर २०२४ या प्रवास कालावधीसाठी वैध आहे.

-विक्री ऑफर केवळ निवडक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय, थेट एका बाजूच्या फ्लाइटवर उपलब्ध आहे.

-या ऑफर अंतर्गत, प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर मर्यादित जागा उपलब्ध आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -