Saturday, July 27, 2024
Homeराशी-भविष्यआयुष्यभरासाठी 50,000 पेंशन पाहिजे असेल तर बघा काय आहे योजना

आयुष्यभरासाठी 50,000 पेंशन पाहिजे असेल तर बघा काय आहे योजना

आयुष्यभरासाठी 50,000 पेंशन पाहिजे असेल तर बघा काय आहे योजना

नमस्कार मित्रांनो, आपण या पोस्ट मध्ये LIC च्या एका लोकप्रिय पेंशन योजना LIC सरल पेंशन योजना याबद्दल माहिती घेणार आहोत. या मध्ये तुम्हाला सरल पेंशन योजनेमध्ये गुंतवणूक, फायदे, पात्रता, कागदपत्रे, वैशिष्ट्ये आणि इतर काही बाबींची माहिती मिळणार आहे. आपल्याला जर या योजनेची संपूर्ण माहिती हवी असेल तर आपण पोस्ट शेवटपर्यंत वाचा.

LIC सरल पेंशन योजना काय आहे

01 जुलै 2021 रोजी LIC ने LIC Saral Pension Plan (862) ही पेंशन योजना सुरू केली. LIC ची ही योजना “ Standard Individual Immediate Annuity Plan ” मध्ये येते, म्हणजेच या प्लॅन चे वैशिष्ट्य असे आहे की यामध्ये मिळणारे पेंशन हे लवकर चालू होते.

जेव्हा तुम्ही या योजनेची पॉलिसी चालू करता त्याच्या पुढील वर्षांपासूनच तुम्हाला पेंशन मिळू लागते. सर्वसामान्यपणे पेंशन ही वयाच्या 60 वर्षांनंतर मिळते. पण LIC सरल पेंशन योजना ही तुम्ही 60 वर्षा आधी निवृत्ती घेणार असाल तरी देखील फायदेशीर ठरते. कारण ही पॉलिसी तुम्ही 40 वयात चालू करू शकता आणि 41 वर्षांपासून तुम्हाला पेंशन मिळू लागेल.

ज्यांना एकदा गुंतवणूक करून पुढील आयुष्यभरासाठी नियमित परतावा हवा असेल, तसेच आपल्या दैनंदिन गरजा / खर्च भागवण्यासाठी गुंतवणूक करण्याच्या दृष्टीने फायदेशीर आहे. या योजनेचे अजून एक वैशिष्ट्य असे आहे की या योजनेमध्ये मिळणारा परतावा हा फिक्स असतो.

LIC सरल पेंशन योजना पात्रता 

१) LIC सरल पेंशन योजनेसाठी किमान वयोमर्यादा 40 वर्षे आहे.

२) LIC सरल पेंशन योजनेसाठी कमाल वयोमर्यादा 80 वर्षे आहे.

3)LIC सरल पेंशन योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीचे वय हे 40 ते 80 वर्षे या दरम्यान असावे. तेव्हाच आपल्याला या योजनेत गुंतवणूक करता येते.

LIC सरल पेंशन योजना फायदे 

LIC सरल पेंशन योजनेमध्ये पॉलिसी सुरू केल्यानंतर पुढे आयुष्यभर पेंशन मिळत राहते.

LIC सरल पेंशन योजनेमध्ये गुंतवणुकीची कमाल मर्यादा नाही.

पॉलिसी सुरू केल्यानंतर जर पॉलिसी धारकाला पैशांची गरज लागली तर 6 महिने झाल्यावर लोन काढता येते. आणि व्याजाची रक्कम ही मिळणाऱ्या पेंशन मधून कपात करण्यात येते.

LIC सरल पेंशन योजना प्रकार 

LIC सरल पेंशन योजनेमध्ये पॉलिसी दोन प्रकारे घेता येते.

1) सिंगल लाईफ ( Single Life )

2) जॉईंट लाईफ ( Joint Life )

सिंगल लाईफ ( Single Life ) 

या प्रकारा मध्ये एकाच व्यक्तीच्या नावे पॉलिसी घेता येते. आणि त्याच व्यक्तीचा विमा उतरवला जातो.

पॉलिसी घेताना आपण ज्या पेंशन पेंमेंट प्रकारची निवड करतो त्याप्रमाणे पुढे आयुष्यभर पेंशन मिळत राहते.

जर, पॉलिसी धारकाचे निधन झाले, तर त्याची पॉलिसी मध्ये जमा केलेली एकूण रक्कम आणि त्यावरील देय व्याज हे पॉलिसी धारकाच्या नॉमिनी ला दिले जाते.

LIC सरल पेंशन योजना गुंतवणूक 

LIC सरल पेंशन योजनेमध्ये आपल्याला एकरकमी रक्कम भरून पॉलिसी मध्ये गुंतवणूक करता येते. जसे बँकेत FD केली जाते तसेच या योजनेत एकरकमी गुंतवणूक करून पेंशन चा लाभ घेता येतो.

म्हणून ही वन टाइम इन्व्हेस्टमेंट योजना आहे. आपल्याला जेवढ्या रकमेचे पेंशन हवे आहे त्या प्रमाणात आपल्याला गुंतवणूक करावी लागते.

किमान मासिक पेन्शन 1000 रुपये येईल त्याप्रमाणे गुंतवणूक करणे आवश्यक आहे.

कमाल गुंतवणुकीची मर्यादा नाही.

LIC सरल पेंशन योजना प्रकार 

आपण जेंव्हा या योजनेत गुंतवणूक करणार असतो त्यावेळी आपल्याला मिळणारे पेंशन पेमेंट कोणत्या प्रकारे पाहिजे हे निवडता येते. या मध्ये एकूण 4 प्रकारे पेंशन घेता येते.

1) मासिक पेंशन

2) त्रैमासिक पेंशन

3) अर्धवार्षिक पेंशन

4) वार्षिक पेंशन

LIC सरल पेंशन योजना बंद कशी करावी

काही विशिष्ट परिस्थितीत ही पेंशन योजना बंद करता येते. पॉलिसी धारक व्यक्ती किंवा त्यांचा कुटुंबातील व्यक्तींना काही गंभीर आजार झाल्यास ही योजना बंद करता येते. आणि त्यावेळी पॉलिसी चालू करताना भरलेल्या रकमेची 95% रक्कम परत मिळते.

LIC सरल पेंशन योजना कर / टॅक्स आकारणी

मृत्यू दावा केल्यावर मिळणाऱ्या रक्कमेवर कोणताही कर / टॅक्स आकारला जात नाही.

मिळणाऱ्या पेंशन ला आपले उत्पन्न समजले जाते, त्यामुळे पेंशन वर कर / टॅक्स आकारला जातो.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -