Friday, December 27, 2024
Homeब्रेकिंगग्रँट रोड परिसरातील टिंबर मार्केटमध्ये भीषण आग, कोणतीही जीवितहानी नाही

ग्रँट रोड परिसरातील टिंबर मार्केटमध्ये भीषण आग, कोणतीही जीवितहानी नाही

मुंबईतील ग्रँट रोड परिसरातील टिंबर मार्केटमध्ये भीषण आग लागली आहे. मध्यरात्री २ च्या सुमारास टिंबर मार्केट चोर बाजार , कामाठीपुरा येथे भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. अग्निशमन दलाच्या 20 पेक्षा अधिक गाड्या घटनास्थळी दाखल असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.मुंबईतील ग्रँट रोड परिसरातील टिंबर मार्केटमध्ये भीषण आग लागली आहे. मध्यरात्री २ च्या सुमारास टिंबर मार्केट चोर बाजार , कामाठीपुरा येथे भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे.

अग्निशमन दलाच्या 20 पेक्षा अधिक गाड्या घटनास्थळी दाखल असून अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ही आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र या आगीमुळे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, ग्रँट रोडच्या टिंबर मार्केट परिसरात मध्यरात्री २ ते ३ च्या सुमारास ही आग लागली. रात्रभर आगीचे लोट उसळत होतेच. अग्निशमन दलाच्या २० ते २२ गाड्या घटनास्थळी असून रात्रभर ते आग विझवण्याचे प्रयत्न करत आहेत. मात्र आगीचे रौद्र रूप अजूनही कायम आहे. या टिंबर मार्केट परिसरात आतमध्ये एक लाकडी घाणा होता. त्यामुळे आग अजूनच वाढली, सगळी लाकडं जळून खाक झाली.

टिंबर मार्केट आणि आसपासच्या परिसरात आगीचे मोठ-मोठे लोट अद्यापही उठत आहेत. तो संपूर्ण परिसर सध्या रिकामा करण्यात आला आहे. टिंबर मार्केट तसेच आजूबाजूच्या परिसरातील इमारती या पूर्णपणे रिकाम्या करण्यात आल्या आहेत. आगीमुळे कोणतीही जीवीतहानी होऊ नये म्हणून ही खबरदारी घेण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -