आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेला अवघे काही महिने बाकी आहेत. त्या हिशोबाने टीम मॅनेजमेंट तयारीला लागली आहे. अशात आता टीम इंडियाला ज्यांनी वर्ल्ड कप जिंकून देण्यात निर्णाायक भूमिका बजावली, तेच आता टीम इंडिया विरुद्ध टी 20 वर्ल्ड कपमध्ये खेळण्यासाठी सज्ज झाले आहेत.आगामी टी 20 वर्ल्ड कपचं आयोजन हे यूएसए आणि वेस्ट इंडिजमध्ये करण्यात आलं आहे. टी 20 वर्ल्ड कप 1 जून ते 29 जून दरम्यान पार पडणार आहे.
या वर्ल्ड कपमध्ये भारताचेच 3 खेळाडू टीम इंडिया विरुद्ध खेळण्याची शक्यता आहे.उनमुक्त चंद याच्या नेतृत्वात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर मात करत अंडर 19 वर्ल्ड कप जिंकला होता. मात्र उनमुक्तला भारताकडून संधी न मिळाल्याने तो आता यूएसएकडून खेळतना दिसणार आहे.उनुक्तच्या नेतृत्वात जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, संजू सॅमसन, मोहम्मद शमी आणि सूर्यकुमार यादव यासारखे अनेक दिग्गज खेळले आहेत.
उनमुक्त व्यतिरिक्त हरमीत सिंह आणि स्मित पटेल हे दोघेही अंडर 19 वर्ल्ड कप विजेत्या संघाचे सदस्य होते.मात्र आता हे तिघे टीम इंडिया विरुद्ध खेळण्यासाठी सज्ज झाले आहेत. हरमीत सिंह हा 19 वर्षांखालील विश्व विजेत्या संघाचा भाग होता. हरमीत अमेरिकेकडून खेळण्यासाठी पात्र ठरला आहे.तसेच टीम इंडिया विरुद्ध खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत स्मित पटेल याचंही नाव आहे.
उन्मुक्त चंद, हरमीत सिंहसह स्मित पटेल हा देखील अमेरिकेकडून खेळण्यासाठी पात्र ठरला आहे. या तिघांची अमेरिका टीमकडून वर्ल्ड कपसाठी निवड झाली, तर हे टीम इंडिया विरुद्ध खेळताना दिसू शकतात.