Friday, June 21, 2024
Homenewsतुम्ही कोणीही माझं काहीही करू शकत नाही, तुम्हा सर्वांना मी पुरुन उरलोय...

तुम्ही कोणीही माझं काहीही करू शकत नाही, तुम्हा सर्वांना मी पुरुन उरलोय : नारायण राणेतुम्ही कोणीही माझं काहीही करू शकत नाही. तुमच्या कोणत्याही प्रतिक्रियेला मी घाबरत नाही. तुम्हा सर्वांना मी आतापर्यंत पुरुन उरलो आहे. शिवसेना वाढवण्यात माझा मोठा वाटा आहे. तेव्हा आताचे कोणी नव्हते. कुठे काय करत होते माहिती नाही. त्यामुळे त्यांना जे काही करायचं ते करुदे, अशी भूमिका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी जनआशीर्वाद यात्रा सुरुच राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आज नारायण राणे यांनी हायकोर्टात याचिका दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी झाली. यानंतर नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली.

काय म्हणाले राणे?
काल रत्नागिरीमधून महाड कोर्टात जाऊन पहाटे 5 वाजता आलो. आज हायकोर्टात माझ्या विरोधात ज्या केसेस दाखल करण्यात आल्या होत्या, त्याबाबत याचिका दाखल केली होती. साडेतीन वाजता सुनावणी याबाबत झाली आहे. माझ्या बाजूने हे निकाल लागले आहेत. 17 सप्टेंबर पर्यंत केस असल्यामुळे याबाबत काही बोलणार नाही. आज पत्रकारांना माहिती देण्यासाठी आलो आहे.

परवापासून यात्रा सुरू होणार : राणे
मागील काही दिवस माझा दौरा सुरू होता. जे काही माध्यमांमध्ये येत होतं याबाबत मला माहिती मिळत होती. काहीजण माझ्या चांगुलपणाचा फायदा घेत होते हे लक्षात आलं. पंतप्रधान मोदींना 7 वर्षे पूर्ण झाली होती. याबाबत ज्या योजना त्यांनी लागू केल्या होत्या ते सांगण्यासाठी ही यात्रा होती. देशातील कॅबिनेटमध्ये मला मंत्री म्हणून घेतलं. आम्हा नवीन सर्व मंत्र्यांना जनआशीर्वाद यात्रा करण्याचं सांगितलं होतं. 19 तारखेपासून मी यात्रा सुरू केली होती. कालपर्यंत सुरू होती. 2 दिवस यात्रा थांबली आहे. परवापासून यात्रा सुरू होणार.

शिवसेना नेत्यांचे शब्द दिसत नाही का? : राणे
मागील काही दिवसांत माझ्याविरोधात लढा सुरू करण्यात आला. परंतु यावेळी मला माझ्या भाजपच्या नेत्यांचं पाठबळ मिळालं. मी काय बोललो ते वाक्य मी परत बोलणार नाही. 52 वर्षात अशी पत्रकारिता पाहिली नाही. शिवसेनेच्या नेत्यांनी असे शब्द उच्चारले नाहीत का? ऑगस्टला बीडीडी चाळींच्या कार्यक्रमात लाड साहेबांना ते बोलले होते महिलांवर हात टाकला तर…. मी सुद्धा असंच बोललो होतो.

माननीय पवार साहेबांनी एवढं चांगलं बोलणाऱ्याला मुख्यमंत्री केलं : राणे
ते महाशय काय बोलले होते. सेनाभवनबाबत कोण जर अशी भाषा करत असेल तर त्याचं थोबाड फोडा. यावर गुन्हा दाखल करायला नको. योगीबाबत बोलले होते योगी आहे की ढोंगी याला चपलाने मारलं पाहिजे. काय केलं होतं त्यांनी? अमित शाह बाबत बोलले होते की, निर्लज्जपणाने हा शब्द वापरतो असं विधानसभेच्या वेळी बोलले होते. माननीय पवार साहेब काय सज्जनपणा आहे. एवढं चांगलं बोलणाऱ्याला मुख्यमंत्री केलं.
RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -