Saturday, May 30, 2026
Homeमहाराष्ट्ररणरणत्या उन्हात जरांगे पाटलांचे आंदोलन, CM फडणवीस यांनी क्लिअर सांगितले, आम्ही जर....

रणरणत्या उन्हात जरांगे पाटलांचे आंदोलन, CM फडणवीस यांनी क्लिअर सांगितले, आम्ही जर….

मराठा आरक्षणासहित प्रलंबित मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून पुन्हा उपोषणाचे हत्यार उपसले आहे. परंतु यावेळी त्यांच्या आंदोलनाचा पॅटर्न वेगळा आहे. मराठवाड्यात तापमानाचा पारा ४० डिग्री अंश सेल्सिअस असताना मोकळ्या मैदानात बाज टाकून त्यांनी कडक उन्हात आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.

 

दुसरीकडे जरांगे पाटील यांना समजाविण्यासाठी सरकारचे शिष्टमंडळ कालच येऊन गेले, परंतु चर्चेत कोणताही तोडगा निघाला नाही. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना शासनाने आतापर्यंत घेतलेल्या निर्णयांचा पाढा वाचून पाठ थोपटून घेतली.

 

मराठा आरक्षणासाठी लढणारे नेते मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे भर उन्हात बेमुदत उपोषण सुरू केल्यानंतर प्रशासनाने मध्यस्थीचे प्रयत्न केले. दुसरीकडे शासन पातळीवर मंत्री, मुख्यमंत्रीही प्रशासनाकडून आंदोलनाची माहिती घेत आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांना आंदोलनाबद्दल विचारल्यावर त्यांनी मराठा समाजासाठी आतापर्यंत घेतलेल्या निर्णयांबद्दल सांगून हाच निर्णय हवा असा हट्ट करणाऱ्यांसाठी कडक इशारा दिला.

मी आणि एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजासाठी जेवढे निर्णय घेतले तेवढे इतिहासात कुणी घेतले नाही

 

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मराठा आरक्षणावर राज्य सरकारची भूमिका सकारात्मक आहे. यापुढे आरक्षण प्रश्नासंबंधी सरकारची भूमिका सकारात्मक राहील. विशेषत मराठा समाजासंबंधी जेवढे निर्णय मी आणि एकनाथ शिंदे यांनी घेतले, तेवढे इतिहासात कधीच कुणी घेतले नाहीत. फक्त हे निर्णय घेत असताना देशाचे संविधान, देशाचे उच्च आणि सर्वोच्च न्यायालय यांनी दिलेले निर्देश यांचे पालन होणे आवश्यक आहे. संविधान आणि न्यायालयाचे निर्णय यांच्या कसोटीवर टिकणारे सर्व निर्णय आम्ही घेऊ.

तर ते फक्त प्रसिद्धीसाठी निर्णय घेतल्यासारखे होईल

 

 

एका समाजाचे काढून घेऊन दुसऱ्या समाजाला देण्याचे काम या सरकारने कधीही केले नाही, असे काम आम्ही करणार नाही. ओबीसी समाजाने घाबरून जाऊ नये. मराठा समाजाचेही आम्ही समाधान करू, त्यांच्यासाठीही निर्णय घेऊ. फक्त आम्ही जर संविधान सर्वोच्च न्यायालय यांनी दिलेले निर्देश पाळले नाही आणि निर्णय घेतले तर केवळ प्रसिद्धीसाठी आम्ही निर्णय घेतले, असे होईल. त्यामुळे आम्ही तसे निर्णय घेणार नाही, असे स्पष्टपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -