Thursday, November 21, 2024
HomeबिजनेसMudra loan : विनातारण अर्जेंट कर्ज : मुद्रा लोन : वाचा माहिती

Mudra loan : विनातारण अर्जेंट कर्ज : मुद्रा लोन : वाचा माहिती

Mudra loan : जर तुमचा स्वतःचा छोटा व्यवसाय असेल आणि तुम्हाला तुमचा business अजून expand करायचा असेल किंवा तुम्हाला नवीन business सुरु करायचा असेल तर अशा परिस्थितीत प्रधानमंत्री मुद्रा लोण योजनेअंतर्गत तुम्हाला 1000000 रुपयां पर्यंत कर्ज सहज उपलबद्ध होऊ शकते.
Pradhan Mantri Mudra Yojana बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हि (about mudra loan in marathi) पोस्ट शेवटपर्यंत नक्की वाचा.

मुद्रा योजना काय आहे? About Mudra loan in Marathi
PM Mudra Yojana करीत केंद्र सरकारने 3 लाख कोटी रुपयांचे बजेट तयार केले होते, त्यापैकी 1.75 लाख कोटी रुपयांचे कर्ज आतापर्यंत वितरित करण्यात आले आहे.
या योजनेचा लाभ मिळवण्याकरिता कोणतेही प्रक्रिया शुल्क सरकारकडून आकारले जात नाही.
मुद्रा योजनेअंतर्गत देशातील नागरिकांना मुद्रा कर्ज घेण्यासाठी मुद्रा कार्ड दिले जाते.

Personal loan : मोबाईलद्वारे मिळवा 5 मिनिटात 2 लाखाचे कर्ज

योजनेचे नाव प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना
योजना कुणी सुरु केली पंतप्रधान नरेंद्र मोदी
लाभार्थी लहान व मध्यम उद्योजक
उद्दिष्ट व्यायसायासाठी कर्ज पुरवठा करणे

पीएम मुद्रा योजनेचे उद्दिष्ट
आज भारत विकसनशील देश जरी असला तरी जलद गतीने विकसित देश बनण्याकडे मार्गाक्रमण करत आहे. अशातच देशातील लहानमोठे उद्योग त्यासाठी हातभार लावताना दिसतात.

म्हणूनच केंद्र सरकारने अशा लहानमोठ्या उद्योगांना अर्थसहाय्य करण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत, लाभार्थी मुद्रा कर्ज घेऊन स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करू शकतात किंवा जर त्यांचा already व्यवसाय असेल तर तो grow करण्यासाठी देखील लाभार्थी कर्ज मिळवू शकतात.

UPI पेमेंटवर लवकरच ‘Make In India’ ची मोहोर! Paytm नंतर Google Pay, Phone Pay पण सलाईनवर?

या योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे, देशातील अधिकाधिक युवकांना व्यवसायासाठी प्रोत्साहित करणे आहे. जेणेकरून देशातील बेरोजगारी कमी होईल त्याचबरोबर देशाची प्रगतीही झपाट्याने होईल.

पीएम मुद्रा कर्ज योजनेचे फायदे
देशातील कोणतीही व्यक्ती ज्याला स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करायचा आहे तो PMMY अंतर्गत कर्ज घेऊ शकतो.
या योजनेअंतर्गत देशातील नागरिकांना स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी हमीशिवाय कर्ज दिले जाईल. याशिवाय कर्जासाठी कोणतेही प्रोसेसिंग शुल्क घेतले जात नाही.
मुद्रा योजनेंतर्गत कर्ज परतफेडीचा कालावधी ५ वर्षांपर्यंत वाढवला जाऊ शकतो.
कर्ज घेणाऱ्या लाभार्थीला मुद्रा कार्ड मिळते, ज्याच्या मदतीने व्यावसायिक गरजांवर खर्च करता येतो.
मुद्रा लोन कागदपत्रे
मुद्रा कर्जासाठी काय आवश्यक आहे?

महिलांसाठी 2 लाखांचे कर्ज : सरकारची नवी योजना : वाचा सविस्तर : Loan for Women

या योजनेसाठी खालील कागदपत्रांची आवश्यकता आहे

आधार कार्ड
पॅन कार्ड
अर्जदाराचा कायमचा पत्ता
व्यवसाय पत्ता आणि स्थापनेचा पुरावा
मागील तीन वर्षांचे Balance Sheet
इन्कम टॅक्स रिटर्न आणि सेल्फ टॅक्स रिटर्न
पासपोर्ट आकाराचा फोटो
व्यवसायासाठी लागणारे मटेरियल किंवा यंत्र सामुग्री इ. त्याचे कोटेशन व बिले.
Mudra Loan पात्रता
मुद्रा कर्जासाठी कोण पात्र आहेत?

‘LIC’चा तिमाही नफा ४९ टक्के वाढीसह ९,४४४ कोटी रुपयांवर : Life Insurance

या योजनेसाठी पात्रता खालीलप्रमाणे आहे

अर्जदार हा भारतीय नागरिक असावा.
कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचे वय १८ वर्षांपेक्षा कमी नसावे.
अर्जदार कोणत्याही बँकेचा थकबाकीदार नसावा.
हि योजना फक्त सरकारी बँकेतच होणार.
लहान व्यवसाय सुरू करणारे लोक आणि ज्यांना त्यांचा लहान व्यवसाय वाढवायचा आहे ते देखील या प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना 2023 अंतर्गत कर्जासाठी अर्ज करू शकतात.

मुद्रा लोन साठी काय करावे लागेल?
मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज मिळवण्यासाठी अर्जदार online आणि offline दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकतात.

Onlineअर्ज करण्याची प्रक्रिया
सर्वप्रथम कोणत्याही सरकारी बँकेच्या अधिकृत वेबसाइटवरून Mudra Loan अर्ज डाउनलोड करा.
आता हा download केलेला अर्ज व्यवस्तीत भरून घ्या सोबतच आवश्यक कागदपत्रे जोडा.
reference ID किंवा क्रमांक मिळविण्यासाठी अधिकृत बँकेच्या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज सबमिट करा.
कर्जाची औपचारिकता पुढे नेण्यासाठी बँकेचा प्रतिनिधी तुमच्याशी संपर्क साधेल. त्यामुळे संदर्भ आयडी क्रमांक तुमच्याजवळ जपून ठेवा.
कर्जाचा अर्ज आणि कागदपत्रांवर प्रक्रिया केल्यानंतर आणि पडताळणी केल्यानंतर, कर्जाची रक्कम मंजूर केली जाईल आणि बँकेद्वारे तुमच्या बँक खात्यात वितरित केली जाईल.
कर्जदार MUDRA कर्जासाठी उद्यम मित्र पोर्टलवर देखील (www.udyamimitra.in) ऑनलाइन अर्ज दाखल करू शकतात.

गुगल पे, फोन पे, पेटीएम वरून 45 दिवसांसाठी बिनव्याजी उधार पैसे मिळवा, वाचा सविस्तर (UPI Now pay later)

Offline अर्ज करण्याची प्रक्रिया
PMMY अंतर्गत MUDRA कर्ज ऑफर करण्यासाठी पात्र असलेल्या तुमच्या जवळच्या बँकेच्या शाखेला भेट द्या
बँकेच्या काउंटरवर सर्व आवश्यक कागदपत्रांसह कर्ज अर्ज भरा आणि सबमिट करा
बँकेसोबत कर्जाची पुढील सर्व औपचारिकता आणि प्रक्रिया पूर्ण करा
सर्व कागदपत्रे तपासल्यानंतर आणि पडताळणी केल्यानंतर, अर्ज मंजूर केला जाईल
कर्ज मंजूरीनंतर, इच्छित रक्कम निर्दिष्ट कामाच्या दिवसांत नमूद केलेल्या बँक खात्यात वितरित केली जाईल.

अधिकृत संकेतस्थळ https://www.mudra.org.in/

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -