येथील शहापूर रामनगर परिसरातील यश कला व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने माघी गणेश जयंती मोठ्या उत्साहाने व विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. यानिमित्ताने आयोजित महाप्रसाद वाटपाचा शुभारंभ ताराराणी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरे, महाराष्ट्र वडार समाजाचे अध्यक्ष मुकूंदराव पोवार यांच्या हस्ते करण्यात आला. असंख्य भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
प्रत्येक महिन्याला मिळवा 5000 रुपये पेन्शन, रोज जमा करा 7 रुपये केवळ
यश कला व सांस्कृतिक मंडळातर्फे दरवर्षी गणेश जयंती विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यंदाही विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
रेल्वे विभागात थेट इतक्या पदांसाठी भरती, दहावी पास असणाऱ्यांसाठी मोठी सुवर्णसंधी, तब्बल..
दुपारी श्रींचा जन्मकाळ साजरा करण्यात आला. यावेळी महिलांनी सामुहिक पाळणा गीत म्हटले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी अब्दुललाट येथील भजनी मंडळाचा दिवसभर कार्यक्रम संपन्न झाला.
Navi अँपमधून ₹20,00,000 पर्यंत मोबाईलवर लोन मिळवा काही मिनटात! असा करा अर्ज
याप्रसंगी सचिन हेरवाडे, बाजीराव गडकरी, रमेश पाटील, अनिल शिकलगार, कोंडीबा दवडते, सुनिल आरगे, मंडळाचे अध्यक्ष रवि मिणेकर, राजू मिणेकर, संतोष दिवटणकर, राहुल बिरंगे, सुधीर लोखंडे, ओंकार मिणेकर, करण रजपुत, सौ. नितू मिणेकर, मुकूंद गागडे आदींसह भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बजाज फायनान्स: 50 हजार रुपये Personal loan मिळवा! परतफेड ८ वर्षात करा !