Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रअक्षय कुमार-टायगर श्रॉफच्या कार्यक्रमात प्रचंड गोंधळ, चप्पलफेक करणाऱ्या जमावावर लाठीचार्ज

अक्षय कुमार-टायगर श्रॉफच्या कार्यक्रमात प्रचंड गोंधळ, चप्पलफेक करणाऱ्या जमावावर लाठीचार्ज

अभिनेता अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ हे एका मोठ्या दुर्घटनेचे शिकार होता होता वाचले. हे दोघं त्यांच्या आगामी ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी लखनऊला गेले होते. या कार्यक्रमात दोघांना पाहण्यासाठी चाहत्यांनी तुंबड गर्दी केली होती. अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी अक्षरश: त्याठिकाणी गोंधळ घातला. हे प्रकरण इतकं वाढत गेलं की अखेर गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.

अक्षय आणि टायगर हे लखनऊच्या घंटाघर याठिकाणी प्रमोशनसाठी पोहोचले होते.अक्षय आणि टायगर हे दोघं त्यांच्या ॲक्शन सीन्स आणि स्टंट्ससाठी ओळखले जातात. आगामी ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ या चित्रपटातही दोघांचे जबरदस्त सीन्स पहायला मिळणार आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान दोघांनी ॲक्शन स्टंट करत एरियल एण्ट्री केली. त्यांची अशी धमाकेदार एण्ट्री पाहून चाहते आणखी उत्साहित झाले. सोशल मीडियावर त्याचा एक व्हिडीओसुद्धा व्हायरल होत आहे.

ज्यामध्ये अक्षय आणि टायगर एका रश्शीच्या सहाय्याने स्टंट करताना स्टेजवर उतरल्याचं पहायला मिळतंय. त्यांची एण्ट्री पाहताना खाली उभे असलेले चाहते जोरजोरात जल्लोष करत आहेत. लखनऊच्या घंटाघरपासून स्टेजपर्यंत हे दोघं एरियलच्या सहाय्याने वर लटकून पोहोचले.अक्षय आणि टायगरच्या एण्ट्रीनंतर जमाव नियंत्रणाबाहेर गेला. सुरक्षाव्यवस्थांनाही त्यांना सांभाळणं कठीण गेलं. कारण तिथे जमलेले काही लोक एकमेकांना चप्पल फेकून मारत होते.

हा हंगामा इतका वाढला की पोलिसांना जमावार सौम्य लाठीचार्ज करावा लागला. या गोंधळामुळे काही वेळासाठी कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता. जमावावर नियंत्रण मिळवल्यानंतर पुन्हा कार्यक्रमाची सुरुवात झाली. तेव्हा टायगर श्रॉफने उपस्थितांची माफीदेखील मागितली. लखनऊमध्ये येणं आणि तिथल्या चाहत्यांची प्रचंड ऊर्जा पाहणं आतापर्यंतचा सर्वांत थक्क करणारा अनुभव होता, अशा शब्दांत तो व्यक्त झाला. या कार्यक्रमात सेलिब्रिटींनी काही स्टंट्ससुद्धा दाखवले.

 

‘बडे मियाँ छोटे मियाँ’ या चित्रपटाची शूटिंग मुंबई, लंडन, अबू धाबी, स्कॉटलँड आणि जॉर्डन अशा विविध ठिकाणी पूर्ण झाली. यामध्ये अक्षय आणि टायगरसोबतच पृथ्वीराज सुकुमारन, सोनाक्षी सिन्हा, मानुषी छिल्लर आणि अलाया एफ यांच्याही भूमिका आहेत. अली अब्बास जफर दिग्दर्शित हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -