जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अॅप असणारं व्हॉट्सअॅप (voice message to text)नेहमी नवनवीन फीचर्स आणत असतं. यामुळेच व्हॉट्सअॅपचे जगभरात तब्बल दोन अब्जांहून अधिक यूजर्स झाले आहेत. आता कंपनीने आपल्या यूजर्ससाठी आणखी एक खास फीचर सादर केलं आहे. यामुळे ऑडिओ मेसेज हे न ऐकताच समजणार आहेत.
कित्येक वेळा आपल्याला एखादी व्यक्ती ऑडिओ मेसेज(voice message to text) पाठवते. मात्र मीटिंगमध्ये असल्यामुळे, किंवा काही कामात असल्यामुळे आपण तो मेसेज ऐकू शकत नाही. काही मित्रच असे असतात ज्यांचे ऑडिओ मेसेज तुम्ही हेडफोनशिवाय ऐकूच शकत नाही. मात्र, आता ऑडिओ मेसेज आल्यानंतर हेडफोनची शोधाशोध करावी लागणार नाही.
व्हॉट्सअॅपच्या या नवीन फीचरचं नाव ‘ट्रान्स्क्राईब’ असं आहे. याच्या मदतीने यूजर्स व्हॉइस मेसेजला टेक्स्ट फॉर्ममध्ये पाहू शकतील. म्हणजेच समोरच्या व्यक्तीने जो ऑडिओ मेसेज पाठवला आहे, तो तुम्हाला ऐकण्यापूर्वी टेक्स्ट मेसेजच्या स्वरुपात वाचता येईल. WABetainfo या वेबसाईटने याबाबत माहिती दिली आहे.
हे फीचर सध्या अँड्रॉईड 2.24.7.8 या बीटा व्हर्जनवर उपलब्ध करून देण्यात आलं आहे. व्हॉट्सअॅप बीटा इन्फोने आपल्या एक्स हँडलवरुन याबाबत माहिती दिली. फोनमध्ये हे फीचर कसं दिसेल याचा स्क्रीनशॉट देखील या पोस्टमध्ये देण्यात आला आहे.
या फीचरची बीटा चाचणी पूर्ण झाल्यानंतर भविष्यात हे सर्व यूजर्सना उपलब्ध होईल असं सांगण्यात आलं आहे.व्हॉट्सअॅपचं हे फीचर iOS यूजर्सना आधीपासून उपलब्ध आहे. 2023 साली मे महिन्यातच हे फीचर आयफोनवर लाँच करण्यात आलं होतं. आतापर्यंत केवळ आयफोनवर उपलब्ध असणारं हे फीचर आता लवकरच अँड्रॉईड यूजर्सना देखील मिळणार असल्याचं कंपनीने स्पष्ट केलं आहे.