आयपीएल 2024 स्पर्धेत प्रत्येक सामन्यानंतर गुणतालिकेत उलथापालथ होत आहे. तसेच ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅपची लढाईही चुरशीची होत आहे. पण पर्पल कॅपची शर्यत मात्र गेल्या काही दिवसांपासून एकतर्फी होताना दिसत आहे. चेन्नई सुपर किंग्सकडून खेळणारा मुस्तफिझुर रहमान याने हा मान पुन्हा मिळवला आहे. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात मुस्तफिझुरने 4 गडी बाद केले होते. त्यानंतर पुढे प्रत्येक सामन्यात एखाद दोन विकेट घेत मानाची कॅप मिरवत राहिला.
मात्र राजस्थान रॉयल्सच्या युझवेंद्र चहलने ही कॅप हिरावून घेतली होती. पण अखेर पुन्हा एकदा ही कॅप मिळण्यात मुस्तफिझुर रहमानला यश आलं आहे. मुस्तफिझुर रहमानने कोलकात्याविरुद्धच्या सामन्यात 4 षटकात 22 धावा देत 2 गडी बाद केले. त्यामुळे 9 विकेटसह अव्वल स्थान गाठलं आहे.चेन्नई सुपर किंग्सच्या मुस्तफिझुर रहमानने पाच सामन्यात 8 च्या इकोनॉमीने 9 गडी बाद केले आहेत. यात 29 धावा देऊन 4 हा सर्वोत्तम स्पेल होता. राजस्थान रॉयल्सच्या युझवेंद्र चहलने 4 सामन्यात 6.35 च्या इकोनॉमीने 8 गडी बाद केले आहेत. दिल्ली कॅपिटल्सच्या खलील अहमदने 5 सामन्यात 8.50 च्या इकोनॉमीने 7 गडी बाद केले आहेत. गुजरात टायटन्सचा मोहित शर्मा या यादीचा चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने 5 सामन्यात 8.68 च्या इकोनॉमीने 7 गडी बाद केले आहेत. तर मुंबई इंडियन्सचा गेराल्ड कोएत्झी पाचव्या स्थानी आहे. त्याने 4 सामन्यात 10.62 च्या इकोनॉमीने 7 गडी बाद केले आहेत.
कोलकात्याची विजयाची गाडी अखेर रुळावरुन घसरली आहे. चेन्नई सुपर किंग्सने होमग्राऊंडवर त्यांना पराभवाचं पाणी पाजलं आहे. त्यामुळे विजयाला खऱ्या अर्थाने ग्रहण लागलं आहे. कोलकात्याने 20 षटकात 9 गडी गमवून 137 धावा केल्या आणि विजयासाठी 138 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान चेन्नई सुपर किंग्सने 17.4 षटकात 3 गडी गमवून पूर्ण केलं. या विजयामुळे चेन्नईला दोन गुण मिळाले आहेत.असं असलं तरी क्रमवारीत काही सुधारणा झालेली नाही. पण नेट रनरेट मात्र सुधारला आहे.दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
कोलकाता नाइट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन): फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), अंगक्रिश रघुवंशी, आंद्रे रसेल, रिंकू सिंग, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती.
चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, समीर रिझवी, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, मुस्तफिजुर रहमान, तुषार देशपांडे, महेश थीक्षाना