Friday, February 7, 2025
Homeइचलकरंजीइचलकरंजी : उद्याचा मंगळवारचा आठवडी बाजार बुधवारी भरणार

इचलकरंजी : उद्याचा मंगळवारचा आठवडी बाजार बुधवारी भरणार

कोल्हापूर जिल्हयातील लोकसभा सार्वत्रिक निवडणूकचे मतदान व मतमोजणी शांततेत, सुव्यवस्थेमध्ये पार पाडणेसाठी ज्या गावांमध्ये मतदान व मतमोजणी दिवशी आठवडी बाजार भरतो.

त्या गावांमध्ये सदर दिवशी भरणारे बाजार, जत्रा बंद ठेवण्यास अथवा पुढे ढकलणेस पणन संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी दिले मान्यतेनुसार अपर जिल्हा दंडाधिकारी, कोल्हापूर यांचे निर्देशानुसार, कार्यकारी दंडाधिकारी तथा अपर तहसिलदार इचलकरंजी यांनी सदर दोन्ही दिवशी इचलकरंजी शहरातील बाजार बंद ठेवणेबाबत आदेश दिले आहेत.

 

त्यानुसार इचलकरंजी शहरात अहिल्याबाई होळकर विकली मार्केट, जवाहर नगर पाण्याची टाकीजवळ व आण्णा रामगोंडा पाटील शाळेसमोरील मार्केट या ठिकाणी मंगळवार ता. ७ रोर्जी भरणारा आठवडा बाजार बुधवार ता. ८ रोजी भरविणेत येणार आहेत. तरी भाजीविक्रेते, ग्राहक, शहरवासीयांनी सहकार्य करावे असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करणेत येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -