आयपीएल 2024 स्पर्धेत प्लेऑफची शर्यत रंगतदार वळणावर आली आहे. मुंबई इंडियन्सने सनरायजर्स हैदराबादला पराभूत केल्याने रंगत आणखी वाढणार आहे. मुंबई इंडियन्स क्वॉलिफाय होणं तर शक्य नाही. मात्र दुसऱ्या संघांसाठी तारणहार किंवा मारक ठरणार आहे. तसं पाहिलं आजच्या सामन्यातील विजय हैदराबादसाठी महत्त्वाचा होता.
मात्र पराभवामुळे प्लेऑफचं गणित आणखी लांबलं आहे. तसेच इतर संघांना यामुळे बळ मिळालं आहे. मुंबई इंडियन्सला या सामन्यात विजय मिळवून तसा काही फायदा नाही. मात्र गुणतालिकेत सर्वात शेवटी असताना थेट नवव्या स्थानी झेप घेतली आहे. गुजरात टायटन्सला मात देत नववं स्थान गाठलं आहे. दुसरीकडे, सनरायझर्स हैदराबादचं टॉप 4 मध्येच आहे. सनरायझर्स हैदराबादचे 12 गुण असून नेट रनरेटवर फटका बसला आहे. मुंबई इंडियन्सने 7 गडी राखून पराभूत केल्याने -0.065 नेट रनरेट इतका झाला आहे. आता उर्वरित तीन सामन्यापैकी दोन सामन्यात काहीही करून विजय मिळवावा लागणार आहे. अन्यथा प्लेऑफची वाट बिकट होईल आणि इतर संघांना संधी मिळेल.
कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांनी आपलं प्लेऑफमधील स्थान जवळपास पक्कं केलं आहे. दोघांचे प्रत्येकी 16 गुण आहेत. कोलकात्याचा नेट रनरेट +1.453 आणि राजस्थानचा नेट रनरेट +0.622 असल्याने क्रमवारीत फरक पडला आहे. कोलकाता नाईट रायडर्स पहिल्या, तर राजस्थान रॉयल्स दुसऱ्या स्थानावर आहे.
चेन्नई सुपर किंग्स 12 गुणांसह तिसऱ्या, सनरायझर्स हैदराबाद 12 गुणांसह चौथ्या, लखनौ सुपर जायंट्स 12 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. यांच्यात फक्त नेट रनरेटचा फरक आहे. त्यामुळे प्लेऑफसाठीच्या दोन संघांसाठी जबरदस्त चुरस पाहायला मिळणार आहे. दिल्ली कॅपिटल्सही रेसमध्ये असून 10 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. उर्वरित तीन सामन्यात विजय मिळवला तर प्लेऑफमधील स्थान पक्कं होईल.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, पंजाब किंग्स, मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांचं आव्हान जवळपास संपुष्टात आलं आहे. मात्र एखादा चमत्कार घडला तर मात्र यापैकी एकाची वर्णी टॉप 4 मध्ये लागू शकते. त्यामुळे येथून पुढे प्रत्येक सामन्याचं महत्त्व आहे. अजूनही तसं पाहिलं तर अधिकृत्या कोणत्याही संघाने प्लेऑफमध्ये स्थान मिळवलेलं नाही.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, मयंक अग्रवाल, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, मार्को जॅनसेन, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, टी नटराजन.
मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): इशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा, नमन धीर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टिम डेव्हिड, अंशुल कंबोज, पीयूष चावला, जसप्रीत बुमराह, नुवान तुषारा.