Tuesday, July 29, 2025
Homeक्रीडादिल्ली कॅपिटल्सचा राजस्थान रॉयल्सला धोबीपछाड, 20 धावांनी केलं पराभूत

दिल्ली कॅपिटल्सचा राजस्थान रॉयल्सला धोबीपछाड, 20 धावांनी केलं पराभूत

आयपीएल 2024 स्पर्धेच्या 56 व्या सामन्यात नाणेफेकीचा कौल राजस्थान रॉयल्सने जिंकला आणि दिल्लीला फलंदाजीचं आमंत्रण दिलं. दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना धावांचा डोंगर रचला. 20 षटकात 8 गडी गमवून 221 धावा केल्या आणि विजयासाठी 222 धावांचं आव्हान दिलं. पण राजस्थान रॉयल्सचा संघ 201 धावा करू शकला आणि 20 धावांनी पराभवाचं तोंड पाहावं लागलं.

आधीच प्लेऑफचं टेन्शन नसल्याने राजस्थानने आक्रमक सुरुवात केली होती. यशस्वी जयस्वालची विकेट पहिल्या षटकात पडल्यानंतरही आक्रमक बाणा सोडला नाही. जोस बटलर आणि कर्णधार संजू सॅमसन यांनी आक्रमक खेळी करत पॉवर प्लेमध्ये 63 धावांची भागीदारी केली. जोस बटलर बाद झाल्यानंतर संजू सॅमसनने रियानसोबत भागीदारी केली. रियान पराग रसिख सलामच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला.पण धावा आणि चेंडू यांच्यातील वाढतं अंतर पाहता कर्णधार संजू सॅमसनने आक्रमक पवित्रा घेतला. जसा चेंडू मिळेल तशी फटकेबाजी केली. समोर कोणता गोलंदाज गोलंदाजी करतो याची तमा बाळगली नाही.

संजू सॅमसनला शुभम दुबेची साथ मिळाली. संजू सॅमसनने 46 चेंडूत 86 धावांची झुंजार खेळी केली. यात त्याने 8 चौकार आणि 6 षटकार मारले. पण बाद होण्यावरून थोडा वाद रंगला. कारण बाँड्री लाईनला कॅच पकडताना पाय लागला की नाही यावरून बाचाबाची झाली. पण पंचांनी त्याला बाद असल्याचं घोषित केलं. त्यामुळे पंचांना निर्णय मान्य करून संजू सॅमसनला जावं लागलं. शुभम दुबने 12 चेंडूत 25 धावा केल्या आणि खलील अहमदच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर राजस्थानने मोक्याच्या क्षणी विकेट्स गमावल्या. दिल्ली कॅपिटल्सकडून खलील अहमदने 2, मुकेश कुमारने 2, कुलदीप यादवने 2, अक्षर पटेल आणि रसिख दार सलामने प्रत्येकी एक गडी बाद केला.

 

दोन्ही संघांची प्लेइंग 11

राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (विकेटकीपर/ कर्णधार), रियान पराग, डोनोवन फरेरा, रोवमन पॉवेल, शुभम दुबे, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -