कानपूरच्या ग्रीन पार्क मैदानात भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस भारताने गाजवला. आज शुक्रवारी सामन्याचा दुसऱ्या दिवशी भारताला पाचवा धक्क बसला. रवींद्र जडेजा अर्धशतक करुन बाद झाला. पण त्यानंतर श्रेयस अय्यरने टीम इंडियासाठी कसोटी पदार्पणातच शतक झळकावलं. श्रेयसनं १५७ चेंडूत शतक पूर्ण केले. यामुळे श्रेयस कसोटी पदार्पणात शतक पूर्ण करणारा १६ वा भारतीय खेळाडू बनला आहे. याआधी पृथ्वी शॉने अशी कामगिरी केली होती. तसेच ऑक्टोबर २०१८ नंतर प्रथमच भारताला कसोटी पदार्पणात शतकवीर मिळाला आहे.