Friday, February 7, 2025
Homeइचलकरंजीइचलकरंजीत शनिवारपासून ज्ञानेश्वरी पारायणाचे आयोजन : राजाराम बोंगार्डे यांची माहिती

इचलकरंजीत शनिवारपासून ज्ञानेश्वरी पारायणाचे आयोजन : राजाराम बोंगार्डे यांची माहिती

 

ताजी बातमी/ ऑनलाइन टीम

येथील विक्रमनगर आरगे मळ्यातील श्री सद्गुरु भक्ती मंदिर याठिकाणी श्री समर्थ सद्गुरु धोंडोपंत महाराज भोसेकर (पंढरपूर) यांच्या स्मरणार्थ 11 ते 17 मे या कालावधीत अखंड नाम सप्ताह व सामुदाईक ज्ञानेश्‍वरी पारायणाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती यशवंत प्रोसेसचे व्हा. चेअरमन राजाराम बोंगार्डे यांनी दिली.

 

ते म्हणाले, या सप्ताह काळात प्रात:काल 4 ते 5 सामदाईक ध्यान चिंतन, 5 ते 6 भुपाळ्या, काकडा आरती, 6 ते 7 दैनिक पुजा, 10 ते 11 ज्ञानेश्‍वरी विषयक प्रवचन, 11 ते 12 सांप्रदाईक भजन, सायंकाळी 5 ते 6 हरिपाठ, 6.30 ते 7.30 ज्ञानेश्‍वरी विषयक प्रवचन, रात्रौ 9 ते 11 हरिकिर्तन व रात्रौ 11 वाजता सांप्रदायिक नित्यपाठ भजन असे कार्यक्रम होणार आहेत.

 

11 मे रोजी सकाळी 7 वाजता ध्वजारोहन, कलशपुजन, ग्रंथपुजन व वीणापुजन, दीपप्रज्वलीत करुन सप्ताहाचा शुभारंभ करण्यात येणार आहेत. शनिवार 11 मे रोजी सायंकाळी हभप परमेश्‍वर आबा भोसले (चिकलठाण) यांचे प्रवचन व रात्रौ हभप सुधाकर महाराज वाघ (पैठण) यांच किर्तन त्यानंतर सांप्रदाईक नित्यपाठाचा भजन होईल.

 

रविवार 12 मे रोजी सायंकाळी हभप विलास मोरे सोलापूरकर यांचे प्रवचन व रात्रौ किरण महाराज बोधले (मानकोजी बोधले महाराज यांचे 11 वे वंशज) यांचे किर्तन त्यानंतर सांप्रदाईक नित्यपाठाचे भजन होईल. सोमवार 13 मे रोजी हभप सदाशिव बाबुराव म्हेत्रे (इचलकरंजी) यांचे प्रवचन व रात्रौ मच्छिंद्र महाराज लांडगे (नायगांव पुणे) यांचे किर्तन होईल.

 

मंगळवार 14 मे रोजी हभप बापू पाटील महाराज (निमगांव) यांचे प्रवचन व रात्रौ हभप लक्ष्मण महाराज मेंगडे (पंढरपूर) यांचे किर्तन होईल. बुधवार 15 मे रोजी हभप अंबादास महाराज घरबडे मिरगव्हाण व हभप आदिनाथ महाराज पंढरपूरकर यांचे प्रवचन व रात्रौ हभप गणेश पाटील (पंढरपूर) यांचे किर्तन होईल.

 

गुरुवार 16 मे रोजी हभप विष्णूपंत नेतले व हभप शमाताई आरगे (इचलकरंजी) यांचे प्रवचन व रात्रौ हभप गुरुवर्य शिवलाल स्वामी महाराज सोलापूरकर (उमेदपूर) यांचे किर्तन होईल.

 

तर शुक्रवार 17 मे रोजी जगदीश महाराज कोल्हापूरकर यांचे प्रवचन व रात्रौ हभप गुरुवर्य शिवलाल स्वामी महाराज सोलापूरकर (उमेदपूर) यांचे काल्याचे किर्तन होईल.

 

शुक्रवार 17 रोजी सकाळी 8 वाजता अखंड नाम सप्ताह व सामुदाईक ज्ञानेश्‍वरी पारायण सोहळ्याची सांगता होईल. त्यानंतर 10 ते 11 सद्गुरु शिवलाल स्वामी महाराज यांचे प्रवचन होऊन धोंडोपंत महाराज भोसेकर, श्री संत ज्ञानेश्‍वर माऊली व श्रीहरी पांडुरंग यांच्या प्रतिमेवर पुष्पवर्षाव होऊन महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.

 

या सर्व कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन बोंगार्डे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -