ताजी बातमी/ ऑनलाइन टीम
इचलकरंजी प्रतिबंधक औषध फवारणी ची मागणी होत आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात डासांची संख्या अत्यंत वाढली असून त्यामुळे अनेक आजार इचलकरंजी शहर व परिसरात वाढत आहेत.
एप्रिल व मे हे अगदी कड्क उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत. एकीकडे अंगाची लाही लाही तर अनेक ठिकाणी चावत असलेली डास आणि वाढत जाणारी रोग राई यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
याचा त्रास खास करून लहान मुले तसेच वृद्धांना जास्त होत आहे आणि यांचे आरोग्य देखील बिघडत आहे. परिणामी दवाखाने देखील हाउसफुल दिसत आहेत. त्यामुळे संपूर्ण शहर व परिसरात जास्तीत जास्त डास प्रतिबंधक औषध फवारणी करावे अशी मागणी नागरिकांतून होत आहे.