टीम इंडियाचा पुढचा हेड कोच कोण बनणार? याची चर्चा आता सुरु झाली आहे. टीम इंडियाला लवकरच एक नवीन हेड कोच मिळू शकतो.
बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी जाहीर केलय की, लवकरच नव्या कोचपदासाठी जाहीरात प्रसिद्ध होईल.
T20 वर्ल्ड कप 2024 नंतर राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यानंतर टीम इंडियाला नवीन कोच मिळू शकतो.
प्रश्न हा आहे की, टीम इंडियाचा पुढचा हेड कोच कोण असेल? कोणावर बीसीसीआय पाण्यासारखा पैसा खर्च करेल?
टीम इंडियाचे माजी फलंदाज आणि NCA प्रमुख व्ही.व्ही.एस लक्ष्मण हेड कोच बनण्याच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. याआधी राहुल द्रविड यांच्या अनुपस्थितीत बीसीसीआयने त्यांच्याकडे हेड कोचची जबाबदारी दिली आहे.
ऑस्ट्रेलियाचा माजी ओपनर जस्टिन लँगर सुद्धा टीम इंडियाचा हेड कोच बनण्यासाठी अर्ज करु शकतो.
ऑस्ट्रेलियाचे माजी दिग्गज ऑलरराऊंडर टॉम मुडी सुद्धा या स्पर्धेत उतरु शकतात. मुडी यांच्याकडे श्रीलंकेच कोच संभाळण्याचा अनुभव आहे.
वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तान टीमचे मेंटॉर राहिलेले अजय जाडेजा सुद्धा या शर्यतीत सहभागी होऊ शकतात. जाडेजाची निवड होण्याची अपेक्षा कमी आहे. पण वनडे वर्ल्ड कपमध्ये अजय जाडेजा यांच्या मार्गदर्शनाखाली अफगाणिस्तान टीमने दमदार प्रदर्शन केलं होतं.
गुजरात टायटन्स टीमचे हेड कोच आशिष नेहरा सुद्धा टीम इंडियाच्या कोच पदासाठी दावेदार आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुजरात टायटन्सची टीम डेब्युमध्ये चॅम्पियन ठरली. मागच्या सीजनमध्ये उपविजेतेपदावर समाधान मानाव लागलं.