मुंबई संपूर्ण, कोकण वगळता कोल्हापूरसह (district one)राज्यातील 29 जिल्ह्यांमध्ये पुढील आठवडाभर ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी किरकोळ अवकाल पावसाची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. राज्यातील 29 जिल्ह्यात रविवार 12 मे पासून पुढील पाच दिवस मध्यम पावसासोबत गारपिटीची शक्यता आहे.
पुढील पाच दिवसात कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव या पाच जिल्ह्यात मध्यम अवकाळी पाऊस(district one) आणि गारपीटीची शक्यता अधिक आहे. मुंबई सहसंपूर्ण कोकणात मात्र आठवडाभर सरासरी इतके 35 आणि 25 डिग्री सेल्सिअस ग्रेड दरम्यान कमालन किमान तापमान राहणार आहे. त्यामुळे एकंदरीत लोकसभा निवडणुकीत चौथी आणि पाचव्या टप्प्यातील मतदान दरम्यान महाराष्ट्रात कोणतीही उष्णतेची लाट जाणवणार नाही.
राज्यात गेल्या काही आठवड्यापासून उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत उष्णतेनं कहर केला आहे. तापमानात वाढ होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. तर, दुसरीकडे देशातील अनेक राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अकोला, अमरावती, वाशीम, बुलढाणा आणि नांदेड येथे काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय, लातूर आणि हिंगोली येथेही अवकाळी पावसाच्या सरी कोसळतील. मात्र, मुंबईसह कोकण पट्ट्यात पुढील चार दिवस उकाडा जाणवण्याची शक्यता आहे.
दरम्यान,हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नागपूर जिल्ह्यात आजपासून (10 मे) पासून पुढील दोन दिवस पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसासह वादळीवारा आणि वीज गर्जनेची शक्यता आहे.