ताजी बातमी/ ऑनलाईन टीम
बँकेत खोटे सोने तारण ठेवून त्यावर सुमारे सात लाख 58 हजार 900 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे.
डॉ. अण्णासाहेब चौगुले अर्बन को ऑप बँकेची इचलकरंजी येथे शाखा आहे या शाखेमध्ये हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी शिवबाबू गुप्ता, सौ राणी गुप्ता राहणार कोल्हापूर नाका व सराफ दत्तात्रय देवकर, राहणार चांदणी चौक अशा एकूण तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची क्रिया विशाल बाळासो नायकवडी राहणार पेठ वडगाव यांनी दिली आहे.