Monday, December 23, 2024
Homeब्रेकिंगआज मैं ऊपर, आसमाँ नीचे… कष्टाचं चीज झालं; इयत्ता बारावीचा निकाल लागताच...

आज मैं ऊपर, आसमाँ नीचे… कष्टाचं चीज झालं; इयत्ता बारावीचा निकाल लागताच तरुणाईंचा जल्लोष

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या 12 वीच्या परीक्षेचा निकाल अखेर आज जाहीर झाला. एकूण 93.37 टक्के निकाल लागला. 13 लाख 29 हजार 684 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली आहे. मुलींचा निकाल 95.44 टक्के आहे तर मुलांचा निकाल 91.60 इतका लागला. मुलींच्या निकालाची टक्केवारी मुलांपेक्षा 3.84 टक्क्यांनी जास्त आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत बारावीच्या निकालाचा टक्का वाढला आहे. 2.12 टक्के जास्त निकाल लागला आहे

यंदा कोकण विभागाचा निकाल सर्वात अधिक 97.51 टक्के इतका तर मुंबईचा निकाल सर्वात कमी म्हणजे 91.95 टक्के लागला.

12 वीच्या परीक्षेतील 154 विषयांपैकी 26 विषयांचा निकाल हा चक्क 100 % इतका लागला आहे.

 

बारावीचा निकाल लागताच तरुणाईने जल्लोष केला. ऑनलाइन निकाल पाहण्यासाठी सर्वच विद्यार्थी उत्सुक होते. 1 वाजता बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर निकाल जाहीर झाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -