Monday, December 23, 2024
Homeमहाराष्ट्र Aartikal....: अकरावी प्रवेश प्रक्रिया: शुक्रवारपासून अर्जाचा पहिला भाग भरता येणार, २२...

[5/21, 2:53 PM] Aartikal….: अकरावी प्रवेश प्रक्रिया: शुक्रवारपासून अर्जाचा पहिला भाग भरता येणार, २२ व २३ मे अर्ज भरण्याच्या सरावासाठी वेळ

मुंबई महानगर क्षेत्र, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महानगरपालिका क्षेत्रांतील इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया उद्यापासून सुरू होणार असून विद्यार्थ्यांना शुक्रवार, २४ मेपासून वैयक्तिक माहिती असणारा अर्जाचा भाग १ भरता येणार आहे. विद्यार्थ्यांनी आपले शहर निवडून  https://11thadmission.org.in या संकेतस्थळावरून अकरावीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करायची आहे.

 

अकरावी प्रवेश प्रक्रियेचा अर्ज कसा भरावा? या अर्जात कोणत्या गोष्टी नमूद करायच्या आहेत? आणि एकूणच ही प्रक्रिया कशी असेल? याबाबत विद्यार्थ्यांना सराव करता यावा, यासाठी २२ व २३ मे रोजी संकेतस्थळावर जाऊन ‘डमी अर्ज’ भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानंतर शुक्रवार, २४ मे रोजी सकाळी ११ वाजल्यापासून ते राज्य मंडळाचा दहावीचा निकाल जाहीर होईपर्यंत  https://11thadmission.org.in या संकेतस्थळावरून वैयक्तिक माहिती असणारा अर्जाचा भाग १ भरता येईल. इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाल्यापासून पुढील साधारण पाच दिवस महाविद्यालय पसंतीक्रम असणारा अर्जाचा भाग २ भरता येणार आहे. अर्जाचा भाग २ हा प्रत्येक फेरीपूर्वी भरता येईल.

यंदा विद्यार्थ्यांसाठी तीन नियमित केंद्रीय प्रवेश फेऱ्या, दोन विशेष केंद्रीय प्रवेश फेऱ्या होणार आहेत. दुसऱ्या विशेष केंद्रीय प्रवेश फेरीत पुर्नपरिक्षा देऊन उत्तीर्ण झालेल्या (एटीकेटी) विद्यार्थ्यांना सहभागी होता येईल. त्यानंतरही जर काही विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नाही. तर मात्र, विशेष आणि दैनिक गुणवत्ता फेऱ्या होतील. यंदा प्रथम येणाऱ्यास प्राधान्य (एफसीएफएस) ही फेरी होणार नाही. प्रत्येक नियमितफेरी बरोबरच विविध कोट्यांतील प्रवेश प्रक्रिया समांतर सुरू राहणार आहे. तसेच पहिल्या विशेष फेरीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर इयत्ता अकरावीचे कनिष्ठ महाविद्यालयातील वर्ग सुरू होतील, असे शिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले.

 

विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याचे टप्पे :

१) विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी करुन लॉगिन आयडी व पासवर्ड सेट करणे.

 

२) वैयक्तिक माहिती असणारा अर्जाचा भाग १ भरून झाल्यानंतर आपली माध्यमिक शाळा किंवा मार्गदर्शन केंद्राकडून सदर अर्ज प्रमाणित करून घेणे.

 

३) महाविद्यालय पसंतीक्रम असणारा अर्जाचा भाग २ भरून प्रवेश फेरीपूर्वी प्रवेशासाठी पसंतीची कनिष्ठ महाविद्यालये ऑनलाईन निवडणे.

प्रवेश प्रक्रियेची कार्यपद्धती :

१) विद्यार्थ्यांना केंद्रीय प्रवेश फेऱ्यांद्वारे महाविद्यालयातील कॅप सीट मिळवून किंवा कोटांतर्गत राखीव जागांवर संबंधित महाविद्यालयात संपर्क साधून, अशा दोन पद्धतीने प्रवेश मिळवता येईल.

 

२) प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी वैयक्तिक माहिती असणारा ऑनलाईन अर्जाचा भाग १ भरून प्रमाणित करुन घेणे आवश्यक आहे. त्यानंतर केंद्रीय प्रवेश फेऱ्याअंतर्गतच्या जागांकरिता (कॅप सीट्स) आयोजित करण्यात येणाऱ्या प्रत्येक फेरीपूर्वी विद्यार्थ्यांना महाविद्यालय पसंतीक्रम असणारा अर्जाचा भाग २ भरून किमान १ व कमाल १० महाविद्यालये निवडता येतील.

 

३) विद्यार्थ्यांनी दिलेल्या पसंतीक्रमानुसार त्यांना प्रवेश फेरीअंतर्गत महाविद्यालय (अलॉटमेंट) देण्यात येईल व त्यानुसार विद्यार्थ्यांनी संबंधित मिळालेल्या महाविद्यालयाआधी संपर्क साधून आपला प्रवेश दिलेल्या वेळेत निश्चित करायचा आहे.

४) कोटांतर्गत प्रवेशासाठी संबंधित महाविद्यालयातील जागेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा ही विद्यार्थ्यांच्या लॉगिनमध्ये देण्यात येईल. कोटांतर्गत प्रवेशामध्ये पसंतीस मर्यादा असेल.

 

प्रवेश फेरीसाठी किती वेळ असणार?

विद्यार्थ्यांना महाविद्यालय देण्यापासून ते प्रवेश निश्चित होईपर्यंतची पहिल्या नियमित केंद्रीय प्रवेश फेरीअंतर्गतची प्रक्रिया ही राज्य मंडळाच्या निकालानंतर १० ते १५ दिवस सुरू राहील. दुसरी व तिसरी नियमित केंद्रीय प्रवेश फेरी, तसेच पहिली विशेष केंद्रीय प्रवेश फेरीची प्रक्रिया ही ७ ते ८ दिवस सुरू राहील. दुसरी विशेष केंद्रीय प्रवेश फेरीची प्रक्रिया एक आठवडा सुरू राहील.

[5/21, 2:59 PM] tajibatmi: 4 जूनला निकाल येताच शेअर बाजार तोडेल सर्व रेकॉर्ड; पंतप्रधान नरेंद्र मोदी उघडपणे बोलले पहिल्यांदाच

 

देशात लोकसभा निवडणुका (Lok Sabha Election 2024) सुरु झाल्यापासून शेअर बाजारात चढउताराचे सत्र सुरु आहे. परदेशी गुंतवणूकदारांनी तर अगोदरच चंबुगबाळे उचलून पोबारा केला आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवडणूक निकालानंतर सरकारी शेअर तेजीत येण्याचे संकेत दिले होते. आता एका मुलाखतीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेअर बाजाराविषयी उघडपणे भूमिका घेतली आहे. 4 जूननंतर पुढील आठवडाभर शेअर बाजार नवीन उच्चांकावर असेल, असा दावा त्यांनी केला आहे.

शेअर ऑपरेट करणारे थकतील

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका टीव्ही न्यूज चॅनलला मुलाखत दिली. त्यात त्यांनी शेअर बाजाराविषयी भाकित केले. लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जून 2024 रोजी लागेल. हा निकाल आल्यानंतर भारतीय शेअर बाजाराचे यापूर्वीचे सर्व रेकॉर्ड इतिहासजमा होतील. बाजार नवीन उच्चांक गाठेल. अनेक रेकॉर्ड मोडीत निघतील.

” तुम्ही पाहाच, निवडणुकीचे निकाल आल्यानंतर संपूर्ण आठवडा अशी काही ट्रेडिंग होईल की त्याला ऑपरेट करणारे थकतील.” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांनी एका दशकाच्या घौडदौडीची आकडेमोड समोर ठेवली. गेल्या 10 वर्षांत शेअर बाजार 25,000 रुपयांहून 75,000 रुपयांवर पोहचल्याचे त्यांनी निर्देशीत केले.

स्टॉक मार्केटमुळे अर्थव्यवस्थेला मजबुती

 

मोदींनी शेअर बाजार आणि अर्थव्यवस्थेविषयी पण भाष्य केले. शेअर बाजारात जोरदार तेजी येईल असे ते म्हणाले. सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर सध्या घौडदौड करत आहेत. जितके अधिक गुंतवणूकदार शेअर बाजारात गुंतवणूक करतील. तितकी अर्थव्यवस्था मजबूत होईल. सरकारने अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी, गतिमान करण्यासाठी सर्वाधिक आर्थिक बदल केल्याचे त्यांनी नमूद केले. उद्योग वाढीला चालना देण्यासाठी आर्थिक धोरण लागू केले, त्याचा परिणाम स्पष्टपणे दिसत असल्याचे ते म्हणाले.

 

जोखीम घेण्याची क्षमता हवी

 

“नागरिकांमध्ये जोखीम घेण्याची क्षमता वाढली पाहिजे, अशी माझी इच्छा आहे. काय होईल आणि मी काय करु? अशा विचाराने कोणतेही काम होत नाही. पूर्वी PSU शेअरमध्ये सातत्याने घसरण दिसत होती. पण आज या क्षेत्राने उसळी घेतली आहे. विरोधक HAL विषयी सर्वप्रकारच्या चर्चा करत होते. आज या कंपनीची परिस्थिती बदलली आहे. चौथ्या तिमाही निकालात या कंपनीचा नफा 4000 कोटी रुपयांच्या घरात पोहचला आहे.”, असे मोदींनी स्पष्ट केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -