Sunday, September 8, 2024
Homeराजकीय घडामोडीमहाराष्ट्रात किती जागा कुणाच्या पारड्यात? अजित पवारांविषयीच्या दाव्याने एकच खळबळ, काय आहे...

महाराष्ट्रात किती जागा कुणाच्या पारड्यात? अजित पवारांविषयीच्या दाव्याने एकच खळबळ, काय आहे या ज्योतिषाचं भाकित

राज्यातील लोकसभेच्या 48 जागांसाठी मतदान संपले आहे. पाच टप्प्यात मतदान झाले. महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही पण या निवडणुकीत मोठ्या फरकाने बहुमत येण्याचा दावा करत आहेत. 4 जून रोजी लोकसभा निवडणूक 2024 चा निकाल लागणार आहे. मग राज्यात कुणाच्या बाजूने कौल लागणार याची जनतेसह राजकीय पक्ष, नेते, राजकीय विश्लेषकांना मोठी उत्सुकता लागली आहे. याविषयी आता काही ज्योतिषांनी भाकित केले आहे.

अजित पवार गटाची पाच जागांवर मदार

 

शिवसेना फुटली तेव्हा राज्यात मोठा भूकंप झाला. एकनाथ शिंदे यांनी बंड केले. त्यांच्या बंडाने राज्यातील सत्ता समीकरण पूर्णपणे बदलले. त्यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेस फुटण्याच्या चर्चा रंगल्या. त्यात राष्ट्रवादीत सुरुंग लागला. राष्ट्रवादीचा किल्ला दोन भागात विभागला. अजित पवार यांच्या नेतृत्वात एक मोठा गट बाजूला गेला. लोकसभा निवडणूक 2024 मध्ये अजित पवार गटाला महायुतीत पाच जागा मिळाल्या.

लोकसभा निवडणुकीत बारामती आणि शिरुर या दोन मतदारसंघात राष्ट्रवादीतील दोन गटात थेट भिडंत झाली. बारामतीत 53.08 टक्के मतदान झाले. येथे खासदार सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रा पवार असा सामना झाला. तर शिरुर मतदारसंघात 54.16 टक्के मतदान झाले. या मतदारसंघात खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याविरोधात शिवाजी आढळराव पाटील अशी चूरस दिसली.

रायगडमध्ये सुनील तटकरे यांच्यात आणि उद्धव ठाकरे गटाचे अनंत गीते यांच्यात रस्सीखेच आहे. धाराशिवमध्ये अजित पवार गटाने ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर यांच्याविरोधात अर्चना पाटील यांना निवडणूकी उभे केले आहे. तर परभणीत अजित पवार गटाने महादेव जानकर यांच्यासाठी जागा सोडली. ठाकरे गटाचे संजय जाधव यांच्याविरोधात हा सामना रंगला.

कुणाच्या पारड्यात सत्ता?

 

ज्योतिषी अनिल थत्ते यांनी लोकसभा निवडणुकीत कुणाच्या पारड्यात किती जागा असतील याचे भाकित केले. त्यांनी महाविकास आघाडी आणि महायुतीला या लोकसभेच्या रणसंग्रामात किती जागा मिळतील याविषयी भाकित केले. त्यांनी महाविकास आघाडीपेक्षा महायुती अधिक जागा मिळण्याचा अंदाज वर्तविला आहे. 37 ते 40 जागेवर महायुती जिंकण्याचा कौल त्यांनी दिला आहे.

 

अजित पवार गटाला किती जागा?

 

अनिल थत्ते यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत, अजित पवार गटाला किती जागा मिळतील याविषयीचा दावा केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. अजित पवार गटाचा एकही उमेदवार निवडून येणार नाही. त्यांचा एक पण खासदार नसेल, असा दावा थत्ते यांनी केला आहे. अर्थात हा केवळ अंदाज आहे. निकालानंतर चित्र स्पष्ट होईल.

 

शरद पवार गटाबाबत हा दावा

 

थत्ते यांनी अजित पवार गट एकही जागा जिंकणार नसल्याचे भाकित केले आहे. तर शरद पवार हा अजित पवार गटापेक्षा जोरदार कामगिरी करणार असल्याची भविष्यवाणी केली आहे. तर उद्धव ठाकरे गटाला या निवडणुकीत सहानभुतीचा फायदा होणार असल्याचे सांगितले आहे. या दोन्ही गटाला किती जागा मिळतील याविषयीचे आकडे समोर आलेले नाहीत

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -