Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईसह राज्यात या दिवशी होणार पावसाला सुरुवात, Monsoon बाबत आली मोठी बातमी

मुंबईसह राज्यात या दिवशी होणार पावसाला सुरुवात, Monsoon बाबत आली मोठी बातमी

उत्तर भारतात गेल्या काही दिवसांपासून उष्णता इतकी वाढली आहे की घराबाहेर पडणं कठीण झाले आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि बिहारसह अनेक राज्यांमध्ये पारा वाढला आहे. उष्णतेचा कहर सुरूच आहे. अनेक शहरांमध्ये तापमान 50 अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. पण यादरम्याने एक मोठी गुडन्यूज देखील आली आहे. येत्या २४ तासांत मान्सून केरळच्या किनारपट्टीवर दाखल होईल, असे हवामान खात्याचे म्हटले आहे. त्यामुळे लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

पुढील काही आठवड्यांत मध्य आणि उत्तर भारतालाही उष्णतेपासून दिलासा मिळणार आहे. बुधवारी हवामान खात्याने अंदाज वर्तवला की, मान्सून केरळकडे सरकत आहे, जो आतापर्यंत मालदीवच्या आसपास होता. तो आता केरळकडे सरकत आहे. त्यानंतर मग तो उत्तर-पूर्व राज्यांकडे सरकणार आहे.

उष्णतेचा तडाखा कमी होणार

उष्णतेच्या लाटेचा सामना करणाऱ्या उत्तर आणि मध्य भारतातील राज्यांसाठीही हवामान खात्याने दिलासादायक बातमी दिली आहे. ३० मेपासून उष्णतेच्या लाटेचा प्रभाव काहीप्रमाणात कमी होण्यास सुरुवात होणार आहे. हवामान खात्याने म्हटले की, पुढील एका आठवड्यात ईशान्येकडील राज्यांमध्ये चांगला पाऊस होईल. त्रिपुरा, मिझोराम, मणिपूर, नागालँड, आसाम आणि मेघालयमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. सिक्कीम आणि बंगालमध्येही हवामान बदलणार आहे. या राज्यात पुढील 5 दिवसात पाऊस होण्याची शक्यता आहे.

 

बंगाल, झारखंड, बिहार व्यतिरिक्त ओडिशामध्ये 31 मे ते 2 जून दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी वादळ येण्याचीही शक्यता आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीर या राज्यांमध्येही हवामान बदलणार आहे. डोंगराळ भागात हलका पाऊस पडू शकतो.

महाराष्ट्रात कधी येणार मान्सून

मुंबई आणि महाराष्ट्रात देखील लवकरच मान्सून दाखल होणार आहे. त्यामुळे उन्हाच्या तडाख्यापासून नागरिकांची लवकरच सुटका होणार आहे. येत्या 10 किंवा 11 जूनला मान्सून मुंबईत दाखल होणार आहे. त्यानंतर 15 जूनपासून पुढे तो संपूर्ण महाराष्ट्रात पसरणार आहे. हवामान खात्याने या वर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. यंदा सरासरीपेक्षा 106 टक्के पावसाची शक्यता आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -