Sunday, December 22, 2024
Homeइचलकरंजीइचलकरंजी : अहिल्यादेवी होळकर जयंती दिनी कर्तबगार महिलांचा सन्मान करावा : धनगर...

इचलकरंजी : अहिल्यादेवी होळकर जयंती दिनी कर्तबगार महिलांचा सन्मान करावा : धनगर समाजाची मागणी

शासन निर्णयानुसार पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर जयंती दिनी ग्रामपंचायत/गट ग्रामपंचायत क्षेत्रातील दोन कर्तबगार महिलांना पुण्यश्‍लोका अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार देण्याबाबत सूचना कराव्यात. तसेच ज्या ग्रामपंचायतीकडून त्याचे उल्लंघन होईल त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन कोल्हापूर जिल्हा धनगर समाज संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे.

निवेदनात, 31 मे 2024 रोजी पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी होत आहे. महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्या पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त दरवर्षी 31 मे रोजी प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रातील महिला व बालविकास क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करत असलेल्या दोन कर्तबगार महिलांना पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार देवून सन्मानित करण्याचा निर्णय गतवर्षी पारीत करण्यात आला आहे.

मात्र काही मोजक्याच ग्रामपंचायत व गट ग्रामपंचायतीमध्येच असा कार्यक्रम घेण्यात येतो. तर अन्य ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष केले जात आहे. अनेक ठिकाणी पुरस्कारासाठीचे स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र व बक्षिसांची रक्कम घेतली जाते, पण कार्यक्रम होत नसल्याबद्दल मागील वर्षी अनेक ग्रामपंचायती विरुध्द तक्रारी आल्या होत्या.

चालू वर्षी शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार सर्वच ग्रामपंचायतीमध्ये हा पुरस्कार कार्यक्रम घेण्याबाबत संबंधितांना सूचना देण्यात याव्यात. त्याचबरोबर ज्या ग्रामपंचायतीत कार्यक्रम होणार नाही त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी, असे म्हटले आहे.

या शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष राजू पुजारी, बबनराव रानगे, राघू हजारे, प्रदीप खोत, मच्छिंद्र बनसोडे, अरविंद पुजारी, संतोष कोळेकर, दत्ताण्णा कुंभोजे, सतिश यड्रावे, मेघना गावडे, योगिता घुले, संजय पटकारे, संदीप हजारे, विकास घागरे, संभाजी गावडे आदींचा समावेश होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -