Sunday, September 8, 2024
Homeइचलकरंजीइचलकरंजी महापालिकेत कामेच होईनात...! खोळंबाच खोळंबा: नगररचना विभागाच्या मनमानी कारभारावर नागरिक त्रस्त

इचलकरंजी महापालिकेत कामेच होईनात…! खोळंबाच खोळंबा: नगररचना विभागाच्या मनमानी कारभारावर नागरिक त्रस्त

इचलकरंजी महानगरपालिकेच्या नगर रचना विभागातील दोन अधिकार्‍यांचा मनमानी कारभारामुळे महानगरपालिकेचे आर्थिक नुकसान होत आहे. शिवाय बांधकाम परवाने देण्यास सातत्याने त्रुटी काढून टाळाटाळ केली जात असल्याने नागरिकांना नाहक त्रास सोसावा लागत असल्याबद्दल नागरिकांनी आमदार प्रकाश आवाडे यांची भेट घेऊन गार्‍हाणे मांडले. या संदर्भात लवकरच आयुक्तांसोबत संबंधितांची बैठक घेऊन हा प्रश्‍न मार्गी लावू अशी ग्वाही आमदार आवाडे यांनी शिष्टमंडळाला दिले.

निवेदनात, इचलकरंजी नगरपरिषदेचे महानगरपालिकेत रुपांतर झाल्यापासून गुंठेवारी, बांधकाम परवाने, लेआऊट आदी कामे गतीने होऊन महानगरपालिकेला उत्पन्न मिळण्यासह शहराच्या विकासाला चालना मिळेल असे वाटत होते. परंतु मागील काही वर्षांपासून ही कामे पूर्णत: बंद पडली आहेत. विशेषत: नगर रचना विभागाकडील दोन रचना सहाय्यक अधिकार्‍यांच्या मनमानीमुळे या कामांना खीळ बसली आहे. संबंधित कामे थांबल्याने महानगरपालिकेला मिळणारा महसूल थांबला असून शहराचा विकास रोखला जात आहे. संबंधित दोन अधिकार्‍यांकडून नागरिकांना तसेच आपल्या विभागातील अधिकार्‍यांना वेठीस धरले जात आहे. काम होत असले तरी काही ना काही त्रुटी काढल्या जात आहेत.

त्याचबरोबर अशक्यप्राय अशी कागदपत्रे आणण्यास सांगितले जात असल्याने नागरिकांची अनेक कामे खोळंबली आहेत. या दोन्ही अधिकार्‍यांना महानगरपालिकेच्या आर्थिक लाभापेक्षा स्वहिताला प्राधान्य दिले जात असून अशामुळे नगररचना विभागच बंद पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांच्या या कामकाज पध्दतीमुळे परवानाधारक इंजिनिअर आणि नागरिक यांच्यात नाहक मतभेद निर्माण होत आहेत. त्यामुळे या प्रश्‍नी लक्ष घालून हा प्रश्‍न मार्गी लावावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

यावर आमदार प्रकाश आवाडे यांनी, आचारसंहिता संपल्यानंतर तातडीने या प्रश्‍नी बैठक घेऊन हा प्रश्‍न सोडवण्याची ग्वाही दिली आहे. शिष्टमंडळात बाळासाहेब कलागते, बाळासाहेब मोहिते, बाहुबली पाटील, प्रमोद लोकरे, अक्षय लोटके, शब्बीर तराळ, सुरज चौगुले, प्रशांत हाके, राजेश मालवणकर, राम चव्हाण, सुधीर शिंदे, मिलिंद शिंदे, तेजस टेकाळे, उत्तम खंजिरे, गोपाळ जोशी आदींचा समावेश होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -