Sunday, December 22, 2024
Homeदेश विदेशबापरे बाप! 1000 रुपयांचे झाले तब्बल 1.40 कोटी, 'या' कंपनीने अनेकांना केलं...

बापरे बाप! 1000 रुपयांचे झाले तब्बल 1.40 कोटी, ‘या’ कंपनीने अनेकांना केलं मालामाल

शेअर मार्केटमध्ये अशा काही कंपन्या आहेत, ज्यांनी गेल्या काही वर्षांत गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. आगामी काळातही या कंपन्या चांगली कामगिरी करू शकतात, असे सांगितले जाते.

 

तुमच्याकडे असलेल्या पैशांच्या माध्यमातून भरघोस कमाई करायची असेल तर शेअर बाजार हा त्यासाठी चांगला पर्याय आहे. शेअर बाजारात योग्य कंपनी निवडून त्यात गुंतवणूक केल्यास तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. शेअर बाजारावर सूचिबद्ध झालेल्या असे अनेक कंपन्या आहेत ज्यांनी गेल्या काही वर्षांत गुंतवणूकदारांना भरघोस परतावा दिलेला आहे. आज अशाच एका कंपनीबद्दल जाणून घेऊ या. या कंपनीने गुंतवणूकदारांना 1 हजार रुपयांचे 1.40 कोटी रुपये दिलेले आहेत.

 

2160 रुपयांचे टार्गेट

जेबी केमिकल्स अँड फार्मा असे या कंपनीचे नाव आहे. ज्या गुंतवणूकदारांनी या कंपनीत दीर्घकाळासाठी गुंतवणूक केलेली आहे, ते गुंतवणूक आज चांगलेच मालामाल झाले आहेत. काही ब्रोकरेज फर्म्सने ही कंपनी आगामी काळातही चांगली कामगिरी करेल अशी शक्यता व्यक्त केली आहे. यातील काही ब्रोकरेज फर्म्सने या कंपनीसाठी 2160 रुपयांचे टार्गेट दिले आहे. 1 जानेवारी 1999 रोजी या कंपनीच्या एका शेअरचे मूल्य 11.41 रुपये होते. ज्यांनी या कंपनीत 1999 साली गुंतवणूक केलेली आहे, त्यांना या कंपनीने 15702 टक्क्यांनी बम्पर रिटर्न्स दिले आहेत. या कंपनीचे सध्याचे बाजार भांडवल 27980 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअरचे 52 आठवड्यातील सर्वोच्च मूल्य 1940 रुपये आणि 52 आठवड्यांतील सर्वाधिक कमी मूल्य 1060 रुपये आहे.

 

5 वर्षांत 860 टक्क्यांनी रिटर्न्स

गेल्या पाच वर्षांत जेबी केमिकल्स या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 860 टक्क्यांनी रिटर्न्स दिले आहेत. गेल्या पाच वर्षांत हा शेअर 188 रुपयांवरून 1803 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. गेल्या एका वर्षात जेबी केमिकल्स या कंपनीने 67 टक्क्यांनी रिटर्न्स दिले आहेत. ही एक स्मॉलकॅप कंपनी आहे. या कंपनीचा आयपीओ आला होता, तेव्हा या कंपनीच्या शेअरचे मूल्य अवघे दहा रुपये होते. काही ब्रोकरेज फर्मच्या म्हणण्यानुसार या कंपनी शेअर आगामी काळात 2160 रुपयांपर्यंत जाऊ शकतो.

 

100 शेअर्सचे झाले 7580 शेअर्स

सन 1986 मध्ये जेबी केमिकल्स अँड फार्माशुटिकल्स या कंपनीचा आयपीओ आला होता. तेव्हा या कंपनीच्या शेअरचे मूल्य 10 रुपये होते. एखाद्या व्यक्तीने या कंपनीच्या आयपीओत 1986 मध्ये 10 रुपयांच्या मूल्यानुसार 100 शेअर्स खरेदी केले असतील तर याच शेअर्सची संख्या आज 7580 रुपये झाली आहे. जेबी केमिकल्स अँड फार्मा या कंपनीच्या शेअरने जानेवारी 2000 पासून आतापर्यंत 8000 टक्क्यांनी रिटर्न्स दिले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -