मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी उभारलेला लढा या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती. बॉक्स ऑफिसवर सध्या हा चित्रपट संथगतीने मार्गक्रमण करतो आहे. अभिनेता रोहन पाटील यांनी या चित्रपटातून मनोज जरांगे पाटील यांची भुमिका साकारली आहे. पहिल्या चार दिवसात या चित्रपटाला हवा तसा जोर मिळाला नाही. परंतु नंतर या चित्रपटाची बऱ्यापैंकी कमाई झालेली पाहायला मिळाली आहे.
ट्रेड अहवालानुसार, या चित्रपटाने पहिल्या चार दिवसांत 42 लाखा रूपयांचा गल्ला जमावला आहे. पहिल्या दिवशी या चित्रपटाने 8 लाख रूपये, दुसऱ्या दिवशी 9 लाख रूपये, तिसऱ्या दिवशी 16 लाख रूपये तर चौथ्या दिवशी 9 लाख रूपये कमावले आहेक. त्यामुळे समोर आलेल्या आकाडेवारीनुसार हा चित्रपट 50 लाख रूपयांचीही कमाई करू शकला नाही.
प्रदर्शित झाल्यापासून आतापर्यंत पाहायचे झाले तर ‘संघर्षयोद्या मनोज जरांगे पाटील’ या चित्रपटाने आतापर्यंत सात दिवसात बॉक्स ऑफिसवर 53 लाख रूपयांची कमाई केली आहे. पाचव्या दिवशी 4 लाख, सहाव्या दिवशी 4 लाख आणि सातव्या दिवशी 3 लाख रूपयांची कमाई केली आहे.
यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्यावर आधारित आणि मराठा आरक्षणाच्या मुद्यावर भाष्य करणारे दोन मराठी चित्रपट तयार करण्यात आले आहे. यात ‘संघर्षयोद्या मनोज जरांगे पाटील’ हा चित्रपट 14 जूनला प्रदर्शित झाला आहे. ‘आम्ही जरांगे : गरजवंत मराठ्यांचा लढा’ हा चित्रपट येत्या 21 जूनला प्रदर्शित झाला आहे. ‘संघर्षयोद्या मनोज जरांगे पाटील’ हा सिनेमा सुरुवातीला 21 जून रोजी प्रदर्शित होणार होता पण निर्मात्यांनी या सिनेमाची तारीख बदलली आणि 14 जून रोजी प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. ‘सॅकनिल्क’ने याविषयी अहवाल दिला आहे.
या चित्रपटाची बरीच चर्चा रंगलेली होती. संदीप पाठक, सागर कारंडे, अरबाज शेख, अभिनेते मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, अभिनेत्री सुरभी हांडे, माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, माधव अभ्यंकर, सोमनाथ अवघडे, किशोर चौगुले सिद्धेश्वर झाडबुके, उर्मिला डांगे, श्रीकृष्ण शिंगणे या कलाकारांच्या यात महत्त्वाच्या भुमिका आहेत. शिवाजी दोलताडे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संस्थेच्या गोवर्धन दोलताडे यांनी चित्रपटाच्या निर्मितीसह चित्रपटाचं लेखनही केलं आहे. सहनिर्माते रामदास मेदगे, विठ्ठल अर्जुन पचपिंड ,जान्हवी मनोज तांबे, दत्तात्रय लोहकरे कार्तिक दोलताडे पाटील, नर्मदा सिनेव्हिजन्स हे आहेत. तर डॉ. सुधीर निकम यांनी संवाद आणि पटकथा लिहिली आहे.