Saturday, November 23, 2024
Homeब्रेकिंग1 जुलैपासून LPG ते क्रेडिट कार्डपर्यंत बदलणार नियम, थेट तुमच्या खिशावर होणार...

1 जुलैपासून LPG ते क्रेडिट कार्डपर्यंत बदलणार नियम, थेट तुमच्या खिशावर होणार परिणाम

येत्या काही दिवसात जुलै महिना सुरु होणार आहे आणि या महिन्याच्या पहिल्याच दिवसापासून देशात काही नियमांमध्ये बदल होणार आहे. ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे.

माहितीनुसार, एलपीजी सिलिंडर, क्रेडिट कार्डचे नियम, सीएनजी-पीएनजीच्या किमतीवर त्याचा परिणाम दिसू शकतो. त्यामुळे तुम्हाला नवीन बदलांची जाणीव असणे महत्त्वाचे आहे.

जुलैमध्ये होणाऱ्या नव्या बदलांचा परिणाम प्रत्येक सामान्य माणसाच्या खिशावर होणार आहे. जर तुम्ही स्वत:साठी दुचाकी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागू शकतात. कारण देशातील सुप्रसिद्ध दुचाकी उत्पादक कंपनी Hero MotoCorp ने वाहनांच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. 1 जुलैपासून काय बदल होऊ शकतात ते जाणून घेऊया.

एलपीजीच्या किमती वाढू शकतात

एलपीजीच्या किमती तेल विपणन कंपन्या दर महिन्याच्या सुरुवातीला ठरवतात. यामुळे 1 जुलै 2024 रोजी एलपीजीच्या किमतीत बदल दिसू शकतो. गेल्या काही काळात व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत अनेक बदल करण्यात आले आहेत, परंतु स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या एलपीजी सिलिंडरच्या किमतीत बराच काळ बदल झालेला नाही, त्यामुळे घरगुती सिलिंडरच्या किमतीत दिलासा मिळण्याची शक्यता आहे होते.

CNG आणि PNG च्या किमतीत चढ-उतार

1 जुलैपासून गॅस वितरण कंपन्या सीएनजी आणि पीएनजीच्या दरात बदल करू शकतात. यासोबतच तेल विपणन कंपन्यांच्या हवाई इंधन म्हणजेच एअर टर्बाइन इंधन (ATF) च्या किमतीतही मोठा बदल दिसून येऊ शकतो. एटीएफच्या किमतीत कपात झाल्यास हवाई प्रवाशांना दिलासा मिळेल. त्याचबरोबर सीएनजीचे दर कमी झाल्यास वाहनचालकांना दिलासा मिळणार आहे.

क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्ये बदल होणार

क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांसाठी, 1 जुलै 2024 ही तारीख तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. क्रेडिट कार्ड पेमेंटशी संबंधित मोठे बदल महिन्याच्या पहिल्याच दिवशी लागू होणार आहेत. RBI च्या नवीन नियमानुसार, 1 जुलैपासून, सर्व क्रेडिट कार्ड बिल पेमेंट भारत बिल पेमेंट सिस्टम (BBPS) द्वारे केले जातील. यानंतर भारत बिल पेमेंट सिस्टम (BBPS) द्वारे बिलिंग करावे लागेल.

एलपीजीच्या किमती वाढू शकतात

CNG आणि PNG च्या किमतीत चढ-उतार

क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्ये बदल होणार

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -