अफगाणिस्तान संघाने ग्रुप स्टेजमध्ये न्यूझीलंड, युगांडा आणि पापुआ न्यू गिनी या संघांचा पराभाव केला होता. त्यानंतर सुपर-8 फेरीमध्ये ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेशला पराभूत करत सेमी फायनल गाठली होती.
अफगाणिस्तानसारख्या संघाने सेमी फायनलमध्ये जागा मिळवल्याने सर्वांनाच धक्का बसला होता. त्यामुळे सेमी फायनलमध्ये चोकर्स म्हणून ओळखले जाणाऱ्या आफ्रिका संघासोबत होणार होता. मात्र आफ्रिकेने अफगाणिस्तानचा पराभव करत फायनलमध्ये स्थान मिळवलं.
अफगाणिस्तान संघाला दक्षिण आफ्रिका संघाने अवघ्या 56 धावांवर गुंडळलं. अफगाणिस्तान संघाची बॉलिंग तगडी आहे हे सर्वांना माहिती आहे. संघर्ष करता येईल इतकंही लक्ष्य आफ्रिकेच्या गोलंदाजांनी गाठून दिलं नाही.
अफगाणिस्तान संघाचा पराभव झाला असला तरी त्यांना 6.55 कोटी रुपये मिळणार आहेत. त्यासोबतच फायनल आणि सेमी फायनल सामना सोडून इतर ज्या सामन्यात विजय मिळवला आहे. त्या सामन्यांचे प्रत्येकी 25.9 लाख रूपये मिळतात. तर वर्ल्ड कप विजेत्या संघाला 20.36 कोटी रुपये बक्षीस मिळतं.