भारताचा अव्वल क्रिकेटपटू एम.एस.धोनी तसं सोशल मीडियापासून दूर राहणं पसंत करतो. पण टीम इंडियाच्या T20 वर्ल्ड कप 2024 च्या जेतेपदाने धोनीला या प्लॅटफॉर्मवर यायला भाग पाडलं. काल बारबाडोस येथे फायनलमध्ये टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला हरवून 17 वर्षानंतर T20 वर्ल्ड कप जिंकला. टीम इंडियाच्या वर्ल्ड कप विजयाने सगळ्यांनाच प्रचंड आनंद झालाय. याला भारताचे माजी क्रिकेटपटू सुद्धा अपवाद नाहीयत. टीम इंडियाला पहिल्यांदा T20 वर्ल्ड कपच विजेतेपद मिळवून देणाऱ्या एमएस धोनीने खास पोस्ट केलीय. बारबाडोसमध्ये T20 वर्ल्ड कप उंचावणाऱ्या रोहित शर्माल जसं कळलं की, धोनीने टीम इंडियासाठी खास पोस्ट केलीय, त्याने लगेच आभार मानले.
ANI शी बोलताना रोहित शर्माने धोनीने जे कौतुक केलं, त्यावर प्रतिक्रिया दिली. धोनीनंतर टीम इंडियाला T20 वर्ल्ड कप जिंकून देणारा रोहित शर्मा दुसरा कॅप्टन आहे. रोहित शर्माने सर्वप्रथम धोनीची प्रशंसा केली. “तो कमीलाचा खेळाडू आहे. त्याने देशासाठी खूप काही केलय. अशावेळी धोनीकडून जर कौतुकाचे शब्द आले असतील, तर ती मोठी गोष्ट आहे” असं रोहित शर्मा म्हणाला.
धोनीच्या कौतुकाशिवाय रोहित शर्मा अजून काय बोलला?
धोनीने इनस्टाग्राम पोस्टमध्ये टीम इंडियासाठी काय म्हटलय, ते आधी जाणून घ्या. धोनीने आधी सर्व टीमला विजयाच्या शुभेच्छा दिल्या. टीम इंडियाने T20 वर्ल्ड कप जिंकण माझ्यासाठी गिफ्टसारख आहे असं धोनीने म्हटलय. रोहित शर्मा ANI शी बोलताना धोनीने जे कौतुक केलं, त्यावर व्यक्त झालाच. पण त्याशिवाय टीम इंडियाचा विजय आणि आपला प्रवास या बद्दल सुद्धा बोलला. “2007 मधील आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायला सुरुवात केली. त्याचवर्षी T20 वर्ल्ड कप जिंकला आणि आता हा वर्ल्ड कप. मी भरपूर खुश आहे” असं रोहित शर्मा म्हणाला.